नागसेनवन
नागसेनवन हा औरंगाबाद शहरातील एक परिसर आहे. बौद्ध भिक्खू नागसेन यांच्या नावावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या परिसराचे नामकरण नागसेनवन केले होते. आंबेडकरांनी या परिसरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठसुद्धा या परिसरात आहे.[१][२] २०१६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारोप वर्षाच्या निमित्ताने नागसेनवन परिसरात पाच लाख वृक्ष लावले आहेत.[३][४] नागसेनवन परिसरातील पी.इ.एस. महाविद्यालयाच्या प्राणांगणात जागतिक बौद्ध धम्म परिषद ही भगवान बुद्धांच्या विवेक, करुणा आणि शांती या उपदेशांचा प्रसार करण्याच्या उदात्त कारणांसह २२ ते २४ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत पार पडली होती. चौदावे दलाई लामा यांची उपस्थिती या परिषदेत होती.[५][६][७][८]
संदर्भ
संपादन- ^ "नागसेनवन परिसरात वृक्षारोपण". Divya Marathi. 2011-07-28. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ "देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी (थापी) औरंगाबादेत ! | eSakal". www.esakal.com. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ "नागसेनवनात लावणार पाच लाख वृक्ष". Maharashtra Times. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ "भीमसागर उसळला". Loksatta. 2016-04-15. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ "Global Buddhist Congregation". gbcindia2019.in. 2019-11-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ "औरंगाबादेत भरणार जागतिक बौद्ध धम्म परिषद; दलाई लामांची उपस्थिती". Lokmat. 21 नोव्हें, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "जागतिक बौद्ध धम्म परिषदेची तयारी जोरात : Video | eSakal". www.esakal.com.
- ^ "औरंगाबाद येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन | eSakal". www.esakal.com. 2020-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-13 रोजी पाहिले.