नागपूर छत्तीसगढ रेल्वे

नागपूर छत्तीसगड रेल्वेचे प्रादेशिक सरकारच्या मालिकाचा ४९ मैल (७९ किमी) १,००० मिमी मीटरमापी रेल्वेमार्ग होता. नागपूर पासून तुमसर - गोंदिया आणि डोंगरगड मार्गे राजनांदगावपर्यंत हा रेल्वेमार्ग होता. [] नागपूर ते तुमसर पर्यंतचा प्रारंभिक विभाग ६ जुलै १८८० रोजी उघडला, २१ फेब्रुवारी १८८१ रोजी तिरोरा पर्यंत, १८ मे १८८१ रोजी गोंदिया पर्यंत, २५ नोव्हेंबर १८८१ रोजी आमगाव पर्यंत आणि १६ फेब्रुवारी १८८२ रोजी राजनांदगाव पर्यंत पूर्ण झाला. []

१८८८ मध्ये नागपूर छत्तीसगड रेल्वे बंगाल नागपूर रेल्वेमार्फत चालविण्यात आली आणि त्याच वर्षी या मार्गाचे १,६७६ मिमी रुंदमापी रेल्वेमध्ये रूपांतर झाले. राजनांदगाव ते आसनसोल हा नवीन मार्ग नंतर १८८८ पासून बंगाल नागपूर रेल्वे द्वारे बांधला गेला. []

संदर्भ

संपादन
  1. ^ Hugh Hughes, Indian Locomotives part 2 Metre Gauge 1872-1940, Continental Railway Circle, 1992 (p. 89)
  2. ^ [१]
  3. ^ Imperial gazetteer of India , Volume 10 by Sir William Wilson Hunter, Great Britain. India Office, 1908