नांदेड आकाशवाणी हे ऑल इंडिया रेडियोचे एफ्एम (Freqency Modulation) रेडियो स्टेशन आहे. या नभोवाणी केंद्राची स्थापना २९ मे १९९१ साली झाली. हे स्टेशन १०१.१ मेगाहर्ट्‌झवर प्रसारण करते. केंद्राचे प्रसारण नांदेड, परभणी, हिंगोली, निझामाबाद, उमरखेड, उदगीर, परळीअहमदपूर या शहरांपर्यंत पोहोचते.

नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम शिक्षण, माहिती, मनोरंजनावर आधारित असतात. हे कार्यक्रम तीन सभांत प्रसारित होतात. पहिल्या प्रसारण सभेत सकाळी ६ वाजेपासून १० वाजेपर्यंत कार्यक्रम असतात. तर , दुसऱ्या सभेत सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध भारती वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतात. तिसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी ६ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत परत नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम प्रसारित होतात.

या कार्यक्रमांत बातम्या, चित्रपट संगीत, लोकसंगीत, भाषणे, मुलाखती, संवाद, नाटके, युवावाणी, किसान वाणी, आरोग्य -विषयक,फोन फर्माइश इ. यांचा समावेश आहे. नांदेड आकाशवाणीचे ४० लाख श्रोते आहेत.

{विस्तार}}