नांदीश्राद्ध किंवा नांदीमुखी श्राद्ध हा एक प्रचलित हिंदू धार्मिक विधी आहे. पुत्रजन्म, विवाह आदि मंगलकार्यावेळी अभ्युदयासाठी हा विधी केला जाई. याला वृद्धिश्राद्ध असेही म्हणत. पुत्र-कन्या जन्म, विवाह, उपनयन, गर्भाधान, यज्ञ, पुंसवन, राज्याभिषेक, अन्नप्राशन विधी इत्यादी प्रसंगी नांदीमुख श्राद्ध केले पाहिजे, असे निर्णयसिंधु ग्रंथात लिहिले आहे. ज्या कार्यामध्ये अभ्युदय किंवा वृद्धि संभवते त्या कार्याच्या आधीही हे श्राद्ध करत. नांदीश्राद्धामध्ये आधी आईचे, मग वडलांचे आणि मग आजी-आजोबांचे श्राद्ध करीत. पुत्रजन्माच्या वेळी करायचे नांदीश्राद्ध दिवसाच्या कोणत्याही वेळी केले तरी चाले, परंतु नांदीश्राद्धातील अन्य श्राद्धे सकाळीच करायची पद्धत होती.

नांदीमुखी (अक्षरगणवृत्त)

संपादन

हे संकृत-हिंदीमधील एक १४ अक्षरी गणवृत्त आहे. याच्या प्रत्येक चरणात न नतत ग ग असे गण येतात. या प्रकारच्या काव्याचे उदाहरण :— नित गहि दुइ पादै गुरू केर जाई। दशरथ सुत चारी लहे भोद पाई। हिय मॅंह धरि कै ध्यान शृंगी ऋषि को। मुदित मन कियो श्राद्ध नांदीमुखी को।

दुर्वांकुर अक्षता पाणी घेऊन ॥ सत्यवसु संज्ञा असलेले ( नांदी मुखाचे ) देव यांना ( वृद्धि श्राद्धा पैकीं ) पाद्य देतो. ( अर्पण असो )

आई, बापाची आई, आजाची आई यांनां पूर्वीप्रमाणेच पाद्य ० ॥ बाप, आजा, पणजा यांना पाद्य ० ॥

आईचा बाप, आजा, पणजा ( यांच्या ) पत्नीसह यांनां पाद्य ० ॥ ( म्हणून अक्षता पाणी दूर्वा प्रत्येक वेळीं पात्रांत सोडावें. याचप्रमाणे सत्यवसु पासून मातामहा पर्यंत प्रत्येक वेळी अक्षता दूर्वा गंध फ़ुले व पाणी सोडून आसन गंधादि उपचार कल्पून पात्रांत सोडावे.

पुनःगौर्यादि १६ ब्राह्मणादि ७ गणपती दुर्गा क्षेत्रपाल यांना ( या नांदीश्राद्धांतील ) दोन ब्राह्मण आतृप्त भोजन करतील इतक्या अन्नाचे किंमती बरोबर मी किंचित् द्रव्य देतो ( ह्मणून कांहीं द्रव्य पाण्यासह पात्रांत सोडावें ) तसें सत्यवसु, मातृ पितामही, पितृ पितासह, मातासह, मातृपितामह० सपत्निक यांना पार्वणासही वरील प्रमाणें द्रव्य सोडून उमास्मै, (१) प्रजापते (२) हे मंत्र म्हणावेत, व केलेल्या नांदीश्राद्धाचें ( श्रेष्ठ ) फ़ल मिळण्यासाठी द्राक्ष व आवळा यांचें किंमती इतके द्रव्य मी देतो म्हणून सोडावे. नंतर मातादिक सर्वत्र प्रसन्न होऊन मंगल देवोत असे म्हणून इळामग्ने (३) हा मंत्र म्हणावा. व इळा मुपह्वयते (४) हाही मंत्र म्हणून हिरण्यानें पात्र वाजवावे. व या नांदीश्राद्धानें नांदीं मुखदेवता प्रसन्न होवोत. या ठिकाणीं विवाह उपनयनाचेवेळीं मंडपदेवता स्थापन करितात व नंतर अहेर करावा.

नंतर केलेल्या कर्माची सांगतां होण्याकरितां अनेक गोत्रांच्या ब्राह्मणांची गंधादिकांनीं पूजा करतो व त्यांना भूयसी दक्षिणा देतो म्हणून पाणी सोडावे नंतर उत्तिष्ठ (५) हा मंत्र व यांतुदेव (६) हाही मंत्र म्हणून अक्षता टाकाव्या व आवाहितदेवतांचें उत्थापन करावे.