नस्य
नस्य हा एक आयुर्वेदिक उपचार आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नाकात औषध घालणे. निरोगी मनुष्याने नेहमी नस्य सेवन केले, तर त्याची त्वचा, खांदे, मान, छाती भरदार, वर आलेली व प्रसन्न असतात. इंद्रिये बळकट व केश काळे असतात. गळसरीच्या वर मान व डोके यांतील सर्व कफवातज विकार होऊ नयेत म्हणून व झाले, तर ते नाहीसे करण्याकरिता नस्य सेवन करावे. नाक हे डोक्याचे द्वार आहे म्हणून नस्याचा उपयोग होतो.
याचे
- दोष बाहेर काढणारे विरेचन,
- वातशामक व बलपुष्टी देणारे बृंहण व
- दोषांचे शामक शमन असे उपयोगानुसार प्रकार आहेत.
विरेचन नस्य शिरःशूल सूज, गळ्याचे विकार, कृमी, ग्रंथी अपस्मार, पीनस इत्यादींवर उपयुक्त. बृंहण नस्य वातजशूल, सूर्यावर्त, स्वरक्षय, अडखळत बोलणे, अवबाहुक इत्यादींवर व शमन नस्य नीलिका, वांग, केशदोष, टक्कल, डोळे लाल असणे इत्यादींवर उपयुक्त.
द्रव्ये
संपादनमोहरीचे तेल इ. स्नेह निरनिराळ्या द्रव्यांनी सिद्ध करून त्यांनी विरेचन नस्य द्यावे. झाडे, पाणी कमी असलेल्या प्रदेशातील प्राण्यांचा मांसरस, रक्त, झाडांचा डिंक तसेच वर सांगितलेल्याप्रमाणे सिद्ध, सौम्य स्नेहांनी बृंहण नस्य आणि अशाच स्नेहांनी व दूध-पाणी यांनी शमन नस्य द्यावे.
प्रकार
संपादन- मर्श,
- प्रतिमर्श,
- अवपीड
- विरेचन व ध्मान.
पैकी पहिले दोन स्नेह नस्याचे प्रकार होत. पहिला प्रासंगिक व प्रमाणाने अधिक, तर दुसरा नित्य पण प्रमाणाने कमी घ्यावयाचा असतो. औषधी चटण्यांचे, काढ्यांचे थेंब घालण्याच्या नस्याला अवपीड म्हणतात. सुंठ इ. तीक्ष्ण औषधींचे थेंब उपयोगात आणले, तर त्याला मूर्थरेचन म्हणतात. याच औषधांचे चूर्ण नाकात फुंकले, तर ध्मान म्हणतात.
वर्ज्य
संपादनवयाच्या सात वर्षाच्या आत व ऐंशीनंतर, सारखा पाऊस पडत असलेल्या दिवशी व ज्या दिवशी ऋतू एकदम बदललेला असेल त्या दिवशी नस्य करू नये. वांती, रेच इत्यादींनी शरीर शुद्ध झाल्याबरोबर, अन्न, पाणी इ. घेतल्याबरोबर व घेण्याची वेळ झाली असताना मलमूत्रांचे वेग आले असताना देऊ नये, तसेच नवे पडसे, श्वास, खोकला, बाळंतीण इत्यादींना देऊ नये.
मुख्य द्रव्य
संपादननेहमी तेलच वापरावे. तूप इत्यादींचा उपयोग केव्हाही नेहमी करू नये. कारण शिर हे कफस्थान आहे.
प्रतिमर्श
संपादनआजन्ममरण नित्य घ्यावे. क्षीण, बाल, वृद्ध, सुखी यांनी केव्हाही घ्यावे. त्याला प्रतिबंधक काही नाही. ते गुणकरच होते. बाकीची नस्ये विधिपूर्वक घेणे अत्यावश्यक आहे.