अर्भकावस्था
नुकत्याच जन्मलेल्या बाळाला नवजात अर्भक (Infant) म्हणतात, व त्याच्या आईला बाळंतीण. त्याचे वय २८ दिवसांचे होईपर्यंत नवजात म्हणतात. २८ दिवसांपासून ते ३ वर्षांपर्यंत बाल्यावस्था व ३ ते १६ वर्षांपर्यंत किशोरावस्था म्हणतात.
नवजात अर्भकाचे श्वसन व रक्ताभिसरण
संपादनजन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. श्वसनाचा मार्ग साफ होऊन मूल जन्मल्यावर प्रथम रडते. तेव्हा श्वसन स्वतंत्रपणे सुरू होते.
- पहिल्या रडण्यानंतर शांत झालेल्या मुलाचा श्वसनाचा दर प्रत्येक मिनिटाला ३० ते ४० इतका असतो. त्यात अनियमित लय असू शकते.
- त्वचेचा रंग गुलाबी असतो, श्वसनक्रियेत किंवा हृदय व रक्ताभिसरणात काही दोष असल्यास बाळाचे ओठ, डोळयाखालचा भाग, हात, पाय व नखे यांवर निळसर झाक असते.
- कधीकधी मूल पांढरट व निस्तेज दिसते. असे काही असल्यास मूल रुग्णालयात पाठवावे.
- श्वसनक्रियेत जर काही दोष असेल तर श्वसनाच्या वेळी बाळाच्या नाकपुडया फुलतात, छातीच्या फासळया आत ओढल्या जातात(Grunting) आणि हनुवटी व मान वर खाली होते.
- श्वसनात जास्त गंभीर दोष असेल तेव्हा श्वास सोडताना बाळ कण्हते.
नवजात अर्भकाची विष्ठा
संपादनबाळ प्रथम शी (विष्ठा) करते ती हिरवट-काळसर रंगाची असते. पहिले दोन ते तीन दिवस हा रंग टिकतो. प्रथम शी करण्याची वेळ जन्मल्यावर ४८ तासांपर्यंत कधीही असू शकते. ४ ते ५ दिवसात काळा रंग जाऊन पिवळी शी होऊ लागते.यात बाळा-बाळात पुष्कळ फरक असतो. काही बाळे दिवसातून १२-१५ वेळा शी करतात. याउलट काही बाळे ४ ते ७ दिवसात एकदाच शी करू लागतात. पिवळी व सैलसर शी असेल तर किती वेळा होते त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नसते.
वजन
संपादनआपल्या देशात नवजात बाळाचे वजन सामान्यतः २ किलोग्रॅम ते ३ किलोग्रॅम (सरासरी २.५ किलोग्रॅम) असते. ते तिसऱ्या महिन्यात दुप्पट व १ वर्षापर्यंत तिप्पट होणे अपेक्षित असते. कोणत्याही बाळाचे हास्य बघितले कि, आपला थकवा नाहीसा होतो.
बाळ जन्मताना घ्यावयाची काळजी
संपादन- बाळाचे डोके बाहेर आल्यावर बाकीचे शरीर पूर्ण बाहेर येण्याची वाट न पहाता, बाळाचा श्वसनमार्ग साफ करावा.
- बाळाला उलटे धरू नका.
- बाळावर पाणी मारू नका.
- बाळाचे नाक, तोंड व घसा स्रावनळीने साफ करावा. म्यूकस नळी नसल्यास, स्वच्छ मऊ सुती कापड करंगळीला गुंडाळून बाळाच्या घशातून बोट फिरवून चिकट पदार्थ काढून टाकावा.
- बाळ बाहेर आल्यावर नाळेतील नाडी तपासून ती थांबल्यावरच नाळ कापावी.
- तोपर्यंत बाळ लगेच कोरडे करावे. लगोलग उबदार कपड्यात गुंडाळून ठेवावे. असे न केल्यास, बाळाच्या शरीराचे तापमान कमी होण्याची शक्यता असते.
- बाळाला गरगर फिरवू नका.
बाळाचे रडणे एक स्वाभाविक क्रिया आहे, जे त्यांच्यासाठी संवादाचे साधन आहे. बाळ रडून भूक, अस्वस्थता, उब, एकटेपणा यांसारख्या अनेक भावनांना व्यक्त करण्याचा प्रयत्न करित असते.
स्तनपानचा सल्ला
संपादनस्तनपानाचा सल्ला सगळ्या प्रमुख बाल आरोग्य संघटना करतात. जर काही कारणाने स्तनपान शक्य नसेल, तर बाळाला बाटलीने दूध पाजायला हवे, ज्यासाठी आईचे काढलेले दूध किंवा डब्यातील दूध फॉर्म्युला द्यावा.