नरेंद्र मोदीचा शपथ ग्रहण समारंभ

नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे संसद पुढारी यांनी भारताचे १५ वे प्रधानमंत्री म्हणून दिनांक २६ मे २०१४ ला, त्या पदाची शपथ घेतल्यानंतर आपला कार्यकाळ सुरू केला.[] ४५ इतर मंत्र्यांनी सुद्धा मोदींसमवेत मंत्रीपदाची शपथ घेतली.[] या समारंभाची नोंदणी माध्यमांनी 'भारतातील प्रधानमंत्र्यांचा प्रथम शपथग्रहण समारंभ ज्यात सर्व सार्क देशांतील प्रमुखांची उपस्थिती होती'अशा प्रकारे केली.पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाज शरीफ,व श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजापाक्षा यांना भारतात व त्यांच्या देशात, यासमारंभास उपस्थित राहिल्याबद्दल, विरोधाचा सामना करावा लागला.

राष्ट्रपती भवनातील समारंभाचे स्थळ

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ (इंग्रजी मजकूर) "दि.२६ मे ला भारताचे १५वे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेतील" Check |दुवा= value (सहाय्य). 26 May 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "थेट: मोदींनी भारताच्या १५व्या प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली,४५ इतर मंत्र्यांनीसुद्धा शपथ घेतली". IBN News. 2014-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ मे २०१४ रोजी पाहिले.