नंदनर्स चिल्ड्रन- द परईयन्स ट्रिस्ट विथ डेस्टिनी डेस्टिनी- तामिळनाडू १८५०-१९५६

नंदनर्स चिल्ड्रन- द परईयन्स ट्रिस्ट विथ डेस्टिनी डेस्टिनी- तामिळनाडू १८५०-१९५६ हे दलित इतिहासाचे अभ्यासक राजशेखर बसू यांनी लिहीलेले पुस्तक आहे. या पुस्तकातून तामिळनाडूतील परियर या दलित समाजघटकाच्या सामाजिक संघर्षाचा आढावा घेण्यात आला आहे. १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत परियर समाज असंघटित होता. त्यानंतर जागरुकता वाढीला लागली. या समाजघटकाच्या सामाजिक उत्थानामध्ये बौद्ध तत्त्वज्ञान व ख्रिश्चन मिशनरी यांचाही मोलाचा वाटा असल्याचे मत लेखकाने मांडले आहे.

आठव्या शतकात जन्मलेले प्रसिद्ध समाजसुधारक नंदन हे तमिळनाडूतील दलितांचे प्रेरणासोत. नंदन यांच्याच नावावरून या पुस्तकाचे नाव 'नंदनर्स चिल्ड्रन' असे देण्यात आले आहे.