ध्रुपद

(धृपद या पानावरून पुनर्निर्देशित)

ध्रुपद, मूलत हिंदुस्तानी अभिजात संगीतातील एक प्रवाह आहे. ध्रुपद म्हणजे ध्रुव पद. भारतीय़ उपखंडात मध्ययुगापर्यंत ध्रुपदाचा प्रभाव होता. या पद्धतीत -"स्थाय़ी, अन्तरा, सञ्चारी, आभोग" नामक चार 'कलि' वा 'स्तर' असतात. काही वेळेस दोन स्तर ही असू शकतात. रागाच्या शुद्ध स्वरूपास ध्रुपदात महत्त्व आहे. गीतांचा विषय साधारणतः भक्ति वा निसर्गवर्णनपर असतो.

धृपद यालाच ध्रुपद किवा धृवपद असे म्हणले आहे, भारताच्या काळाच्या पूर्वीही ध्रवगायन प्रचारात होते, ध्रवगायनाचा अपभ्रंश ध्रवपद झाला असावा असे म्हणले जाते, या भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रकाराचा वैदिक मंत्रांमधील नाद योगावर आधारलेला आहे.[ संदर्भ हवा ] १८ व्या शतकात मागे पडलेली धृपद गायकी चौदाव्या शतकाच्या शेवटी आणि १५ व्या शतकाच्या सुरुवातीला राजा मानसिंग आणि त्यांची उत्कृष्ट गायक असलेली पत्नी मृगनयना या उभयतांनी प्रचारात आणली असे म्हणले जाते. अतिशय पुरातन असलेली ही गायन पद्धती बाबा बैरम खान आणि त्यांचे चुलत नातू झाकिरुद्दीन आणि अल्लाबंदेखान ह्यांनी रजपूत आणि मोगल राजदरबारांमध्ये चालू ठेवली. पुढे ५ शतकांनंतरही म्हणजे १९-२०व्या शतकात धृपद गायकी अस्तित्वात ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी डागर बंधू (नसीर मोईउद्दीन डागर आणि नसीर अमीनुद्दीन डागर) ह्यांनी केली.

ख्यालगायकीच्या आधीही धृपदगायकी अस्तित्वात होती.

धृपद गायकीची सुरुवात संथ आलापीने होते. नंतर त्यात लय वाढते आणि आवाजाच्या घुमारावर भर देऊन, जोरकस, लयबद्ध बेहेलावे गायले जातात. ह्या गायकीत लयबद्ध सृजनतेला महत्त्व आहे. एकपटीत, दुपटीत, तिपटीत, चौपटीत “धृपद” गाऊन पुन्हा सम असते. “धृपादाला” साथ पखवाजावर केली जाते. पखवाजाला तबल्याचा पूर्वज मानतात. “धृपद” चौतालात (१२ मात्रांत), धमारात (१४ मात्रांत), झपतालात (१० मात्रांत), सूलतालात (१० मात्रांत), किंवा तीव्र तालात (१० मात्रांत) गायले जाते. ह्या गायनप्रकारात मुरकी, फिरत, तान, ह्या “ख्यालाशी” निगडित गोष्टी अजिबात वापरात येत नाहीत.

डुमराव घराणा - बिहारच्या धृपद परंपरा डुमराव घराणा ही धृपद संगीताची सुमारे 500 वर्षे जुनी परंपरा आहे. हे घराणे जेव्हा स्थापन झाले तेव्हा डुमराव राजांच्या राजांच्या आश्रयाने भरभराट झाली. या घराण्यातील द्रुपद शैली (वाणी) म्हणजे गौहर, खंडार आणि नौहरवाणी. या घराण्याचे संस्थापक पं. माणिकचंद दुबे आणि पं. अनुप चंद दुबे. दोन्ही कलाकारांना मुघल सम्राट शाहजहान यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे वडील जे डुमराव घराणा परंपरेशी संबंधित होते. तो सहसा धृपद शैलीत शहनाई वाजवत असे. डुमराव घराण्यातील (बक्सर) प्रसिद्ध जिवंत गायकांमध्ये डुमराव घराण्याचे प्रतिनिधी पं रामजी मिश्रा.पं. कमोद मिश्रा- वृंदावन डुमराव घराण्याचे प्रतिनिधी.

या घराण्याने अनेक पुस्तके लिहिली आहेत, जसे की श्रीकृष्ण रामायण, पं. जयप्रकाश दुबे आणि प्रकाश कवी लिखित घाणा रंग दुबे, सूरप्रकाश, भैरव, प्रकाश, राशप्रकाश. अभिषेक संगित पल्लव यांनी डॉ. अरविंद कुमार.

या घराण्यावर बरेच काम झाले आहे आणि या डुमराव घराण्याच्या अनेक वस्तू संशोधनाचे विषय आहेत.[19]

धृपदाचे चार भाग

संपादन

धृपदामध्ये 'अस्थाई', 'अंतरा', 'संचारी' आणि 'अभोगी' असे चार भाग असतात.

  • "अस्थाई" याला स्थाई असेही म्हणतात. गीताच्या पूर्वार्धास किवा पहिल्या भागास 'अस्थाई' असे म्हणतात.
  • "अंतरा" गीताच्या उत्तरार्धास किवा दुसऱ्या भागास अंतरा म्हणतात.
  • संचारी गीतातील दुसऱ्या अंतऱ्यास संचारी असे म्हणतात.
  • "अभोगी" गीताच्या तिसऱ्या अंतऱ्यास अभोगी असे म्हणतात.

चौताल, रुद्रताल, सुलफाक, झंपा, तेवरा, ब्रह्मताल, झपताल इत्यादी तालांचा वापर धृपद गायनासाठी केला जातो, धृपद गायनामध्ये तानांचा वापर केला जात नाही.

धृपदबानी

संपादन

धृपद गायनाच्या वेगवेगळ्या शैलींवरून धृपद गायकीचे चार प्रकार (बानी) निर्माण झाले. गौड हार बानी, खंडहार बानी, डागूर बानी आणि नौहार बानी या चारही बान्या १५५६ ते १६०५ म्हणजे अकबराच्या काळात निर्माण झाल्या. प्रत्येक बानीच्या पद्धतीनुसार धृपद गायन होत असे.

संदर्भ

संपादन
  • ओळख संगीतशास्त्राची - लेखिका डॉ. भाग्यश्री कुलकर्णी पान क्र. ५५ व ५६