धूलिवंदन

(धुळवड या पानावरून पुनर्निर्देशित)

धुलिवंदन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी ( फाल्गुन वद्य प्रतिपदेस) साजरा करतात. यास धुळवड असेही म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते.हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात.

कोकणात प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते.