धाराशिव लेणी

मराठवाड्यातील धाराशिव गावाजवळचा प्राचीन लेणीसमूह

धाराशिव लेणी हा मराठवाड्यातील धाराशिव (उस्मानाबाद) गावाजवळचा प्राचीन लेणीसमूह आहे. धाराशिव पासून ५ कि.मी. अंतरावर शैव लेणी आहेत. त्यांना 'चांभार लेणी' असेही म्हणतात.[ संदर्भ हवा ]

मुख्य सभागृह

इतिहास संपादन

ही लेणी धाराशिव शहराजवळ ६ व्या शतकात बालाघाट डोंगररांगेत कोरलेली आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशी ११ लेणी येथे आढळतात. बऱ्याच ठिकाणी हिंदू किंवा सनातन धर्मीय लोकांनी आपल्या देव दैवतांची मूर्तीरूपे कोरून ठेवलेली आजही पाहायला मिळतात. मुख्यत्वे शिव, विष्णू ह्या बहुप्रिय देवांची पाषाणात कोरलेली लेणी पहावयास मिळतात.[१]

बौद्धलेणी संपादन

येथे सात लेणी असून पहिल्या लेण्यात सामग्री आढळते. दुसरे लेणे मुख्यतः वाकाटक शैलीतील आहे. मुख्य दालन ८० चौरस फूट लांब असून तेथे बौद्ध भिख्खूंसाठी १४ निवारा गृहे आहेत. गाभाऱ्यात पद्मासन अवस्थेतील बुद्ध मूर्ती आहे. तिसरे लेणे पहिल्या लेण्याप्रमाणेच आहे. बाकी लेणी जैन सदृश्य आहेत. [२][३]

जैन लेणी संपादन

धाराशिवच्या ईशान्येस २० कि.मी अंतरावर प्रसिद्ध अशी सात जैन लेणी आहेत. दुसऱ्या लेण्यात आठ स्तंभ आणि पाच प्रवेशद्वारे आहेत. दोन्ही बाजूस २२ खोल्या असून गर्भगृहात भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर यांची भव्य प्रतिमा आहे. करकंडचरिऊ नामक जैन ग्रंथात या लेण्यांचे वर्णन आढळते.

सद्यस्थिती संपादन

धाराशिव लेणीवर बौद्ध व जैन दावा करतात. परंतु जेम्स बर्गस यांच्या महाराष्ट्रातील १२०० लेण्यावरील संशोधनानुसार धाराशिव लेणी इ.स. ५ व्या शतकात बौद्ध लेणी होती. नंतर १२ व्या शतकात त्यातील काही लेणी जैन लेण्यांमध्ये परावर्तित केली गेली आहेत.[४] [५]

अन्य माहिती संपादन

पेशवाईच्या काळात या लेण्यांमध्ये हरी नारायण नामक एका सत्पुरुष तपश्चर्या करीत होते, असे समजते. या संप्रदायाचा एक मठही धाराशिवमध्ये आहे.[६]

संदर्भ संपादन