धर्मेंद्र प्रधान

भारतीय राजकारणी

धर्मेंद्र प्रधान (२६ जून, १९६९ - ) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे भारताच्या शिक्षण तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचे मंत्री होते. ते खनिज तेल आणि नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्रीही राहिले आहेत.

प्रधान यांना ३ सप्टेंबर, २०१७ रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती देण्यात आली. प्रधान राज्यसभेत मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते १४ व्या लोकसभेचे सदस्य होते.

ते देबेंद्र प्रधान यांचे पुत्र आहेत, ते १९९९-२००४ या काळात वाजपेयी सरकारमध्ये राज्यमंत्रीही होते. ते मूळचे ओडिशातील तालचेर शहरातील आहेत.

संदर्भ आणि नोंदी

संपादन