धर्मनिरपेक्ष ईहवादी नीतिशास्त्र

धर्मनिरपेक्ष ईहवादी नीतिशास्त्र व मानवतावाद

( Secular Ethics and Humanism )

आज आपणास नेमके काय हवे आहे ? तर आपल्याला मिळालेल्या परिस्थितीप्रमाणे आपले अचूक व निश्चित सुख ठराविण्याचे ज्ञान हवे. असे ज्ञान फक्त ईहवादी ( सेक्युलर ) जीवनाच्या आधारेच आहे . कोणत्याही धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यघटनेत प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिक , कौटुंबिक व सामाजिक जीवन हे कायदा व जास्तीतजास्त नैतिक व्यवस्थेवर आधारित असेल तरच देशातील उच्चशिक्षण व संपूर्ण सामाजिक व्यवस्थापन ज्ञानाधिष्ठित होईल. आपल्या दैनंदिन व्यवहार जीवनातील समस्या सोडविण्यासाठी हे ज्ञान आहे. जास्तीतजास्त सामाज शास्त्रीयपद्धतीने हे स्वतंत्रपणे असणार आहे. सर्वाना शास्त्रीय पद्धतीने वृथा कर्मकांडे टाळून , शुद्ध नैतिक व्यवस्थे साठी वैचारिक धन प्राप्त करणे कठीण झाले आहे. सर्व धर्मनिर्पेक्षतावादी , पुरोगामी राज्य घटनेस पूरक असे विज्ञान दृष्टीकोनाने मूल्यशिक्षण देणारी विचारसरणी पूर्वी कधी रचली गेली नाही. हीच अडचण सोडवण्यासाठी ही संस्था मानाविजीवन मूल्यांचे मार्गदर्शन होण्या साठी पुढील प्रमाणे अभ्यासक्रम तयार करीत आहे. १) मानवाचे शिक्षण ही संकल्पना सुस्पष्ट व परिपूर्ण होण्यासाठी प्रथम ज्ञान व माहिती म्हणजे नेमके काय? या संकल्पना सुनिश्चीतपणे स्पष्ट करून त्यानुसार शिक्षणात ज्ञानाचे विचार तसेच ज्ञान व माहिती कोणत्या प्रमाणात असावी हे ठरविणे. २) शिक्षणाचे सुनिश्चित ध्येय कोणते ?शिक्षण पद्धती कशी असावी? ३) प्रत्येक व्यक्तीला स्वज्ञान व स्वतः विषयी माहिती यातील फरक व दोन्हींची गरज स्पष्ट करणे . ४) स्वज्ञान होण्यासाठी मी कोण व कसा आहे ?मानवी आत्मअस्तित्वाचे निश्चित स्वरूप सांगणे. ५) आत्मा जडआत्मक कि अ – जडआत्मक आहे , मानवाचे मन , शरीर, प्राण, व आत्मा या संकल्पना तर्क शास्त्रीय पद्धतीने साधार स्पष्ट करणे. ६) मानवी जीवनात आणि विश्वजीवनात प्रत्येक व्यक्तीने माझे कश्याला म्हणायचे ? का म्हणायचे ? ते कश्यावरून ठरवआयचे ? याचे विवेचन देणे. ७) सद् गुण कश्याचा आधारे ठरवआयचे?सकस गुण व सद गुण यांचे परस्पर नाते व ते प्राप्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची नैतिक कर्तव्ये कोणती ? तसेच कर्तव्य व हक्क या संकल्पना स्पष्ट करणे. ८) माहितीच्या तुलनेत ज्ञानाचे मूल्य कोणते ? ज्ञान घेणारे व देणारे दोघांनी ज्ञानाचे मूल्य कसे करावे? ९) प्रत्येक मानवाने स्वतःच्या कोणत्याही स्थळ-काल-परिस्थितीत नेमके काय प्राप्त करावे? त्याचे सुनिश्चित ध्येय / जीवन साफल्य कोणते ? ते साध्य कसे करावे ? १०) निश्चितपने शरीराचे , मनाचे, आत्म्याचे सुख कोणते ? ११) समता , स्वातंत्र्य बंधुत्व , सत्यम – शिवं- सुंदरम आणि न्याय, स्वातंत्र्य, नीती, कायदा, या संकल्पना नव्याने स्पष्ट करणे. १२) कौटुंबिक नीतीमत्ता,व्यक्ती आणि कुटुंब, व्यक्ती आणि समाज, व्यक्ती आणि पर्यावरण, व्यक्ती आणि विश्व निर्माता , या नात्या नुसार प्रत्येक व्यक्तीचे नाते संबंध , कर्तव्ये आणि हक्क, राष्ट्रवाद आणि धर्मवाद, राष्ट्रवाद आणि मानवतावाद या मधील फरक स्पष्ट करणे. १३) मृत्यूची मानवी जीवनातील भूमिका, इच्छामरण बद्दल सुनिश्चित सत्य व शरीर आत्मसंरक्षणाबद्दल कर्तव्य. १४) नैसर्गिक संपत्ती व पर्यावरणातील सजीव सृष्टी बद्दलचे कर्तव्य १५) प्रेम, भक्ती, आदर, कर्तव्य, या भाव दर्शक संकल्पना स्पष्ट करणे. पश्चाताप –प्रायश्चित्त – शिक्षा व दया , ज्ञान व प्रेम, ज्ञान व भक्ती यांचे परस्पर अटल नाते, इच्छा, गरजा, कर्तव्ये या संकल्पना स्पष्ट करणे. १६) पुनर्जन्म बद्दल सुनिश्चित सत्य शास्त्रीय पत्द्धातीने मांडणे. १७) मानवी जीवनाचे सुनिश्चित ध्येय , अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीत जन्मास आलेल्या व्यक्तीची जीवन कर्तव्ये आणि हक्क , पुनर्जन्मावरील कर्मसिद्धांत नाकारून नवा कर्म सिद्धांत , कर्माचे फळ व मूल्य ही संकल्पना , मानवी कर्माचे मूल्य मापन करण्याचे अधिष्ठान – कर्म शास्त्र निर्माण करणे . १८) मानवी जीवनात कलेचे स्थान , कलामिमांसा नव्या अर्थाने मांडणे, कलेबद्दल प्रत्येक माणसाचे हक्क व कर्तव्य , कलेचे अधिष्ठान – जीवनासाठी कला कि कलेसाठी जीवन या बद्दल नवी मांडणी करणे. १९) जीवनासाठी नियम कि नियमासाठी जीवन याचे स्पष्टीकरण, सजीव व निर्जीव सृष्टीची निर्मिती, बांधणी आणि त्याचे पारस्पारिक संबंध २०) आत्मा, परमात्मा तसेच मानव, देव व दानव या संकल्पना सुस्पष्ट करणे.व अखंड-अनंत अविनाशी विश्वात मानवाचे स्थान २१) स्त्री-पुरुष शरीर संबंधा विषयी अत्यंत नव्या पद्धतीने नैतिकतेची मांडणी , लैंगिक शिक्षण, स्त्री- पुरुष समानते विषयी निश्चित भूमिका, प्रेम आणि लैंगिक तृप्ती, प्रणय सुख निष्पाप भावनेने अनुभविण्याचा हक्क मानवास आहे कि नाही ?वेश्या व्यवसाय हा व्यापार कि सेवा ? शारीरिक संबंध हे केवळ कर्तव्यच म्हणून आहेत का? २२) प्रत्येक मानवाचे जीवन साफल्य त्याची गरिबी-श्रीमंती या बाबत असणारी निरपेक्षता , सत्ता, संपत्ती, कीर्ती, सुंदर स्त्री/ सामर्थ्यवान पुरुष यांची प्राप्ती आणि जीवन साफल्य यांचा संबंध आहे कि नाही? प्रत्येक स्थळ काळ परिस्थितीत परिस्थिती निरपेक्ष जीवन साध्य . अश्या तऱ्हेने या सर्व वास्तव वादि आणि दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्तीला व समाज जीवनाला उपयुक्त असणाऱ्या संकल्पनेबद्दल सुस्पष्टता असणारी नव विचार सरणी होय. तुमच्या दैनंदिन जीवनातल्या अगदी पाच ते दहा टक्के वेळेत मूल्यात्मक त्याग करून तुम्ही देखील सुखी होऊ शकता.


धर्मनिरपेक्ष ईहवादी नीतिशास्त्र व मानवतावाद ( Secular Ethics and Humanism ) याचे विद्यापीठ , मिरज ( सांगली ) महाराष्ट्र - ४१६ ४१० संस्थापकीय अध्यक्ष व लेखक : श्री सदाशिव यादवाडे फोन : ०२३३-२२२०४५० मोबाईल : +९१ ८२७५१७७८७७