द मिराज

(द मिरेज या पानावरून पुनर्निर्देशित)

दी मायरेज हे अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आलिशान हॉटेल आहे. ३,०४४ खोल्यांचे हे हॉटेल पॉलिनेशियन थीम[मराठी शब्द सुचवा]ने बांधण्यात आलेले आहे.[]

हे रिझॉर्ट स्टीव्ह विन या विकासकाने बांधले. सध्या त्याची मालकी एमजीएम रिझॉर्ट्‌स इंटरनॅशनल यांचेकडे आहे. मायरेज, ट्रेझर आयलंड हॉटेल आणि कसीनो हे दुसरे हॉटेल यांच्या दरम्यान फुकट ट्रामसेवा आहे.

इतिहास

संपादन

या होटेलची रचना जोएल बर्गमन यांनी केली. २२ नोव्हेंबर, १९८९ रोजी हे हॉटेल चालू झाले. वॉल स्ट्रीट यांनी हे पहिले रिझॉर्ट कास्तावेझ यांच्या मूळ मालकीच्या जागेवर बांधले. त्यापूर्वी ते रेड रूस्टर नाइट क्लब म्हणून अस्तित्वात होते. सन १९८०मध्ये स्टीव्ह विन यांनी त्यांचा घरोबा असणारा मित्र रोजर थॉमस याला या गटात सामील होण्यासाठी विचारणा केली. आणि या दोघांनी मिळून लास वेगास येथे इतर हॉटेलांपेक्षा अगदी निराळ्या पहिल्या हॉटेल आणि मनोरंजन केंद्राची उभारणी केली.

मायरेज हॉटेल हे खूप खर्च करून बांधलेले हॉटेल व मनोरंजन केंद्र (कसीनो) आहे. त्याचा बांधकाम खर्च ६३ कोटी डॉलर इतका होता. या हॉटेलच्या भिंती आणि विशेषतः खिडक्या सोन्याचा मुलामा देऊन मढविलेल्या असून त्यांना नयन सुखदायक छटा दिलेल्या आहेत. वेगास रिझॉर्ट बांधण्यासाठी विन यांनी आधुनिक पद्धत वापर्ल्याने आता त्यांना लास वेगासचे पितामह असे म्हणले जाते. तत्पूर्वी सन १९७०पर्यंत देशी विदेशी पर्यटक न्यूजर्सी येथे जुगार खेळण्यासाठी वारंवार येत असत तसेच अटलांटिक शहरातही पर्यटक मनोरंजनासाठी (कसीनो) येत असत. अलीकडील काळात लास वेगास हे आधुनिक चालीरीतीचे (Fashion) ठिकाण म्हणून संबोधले जाऊ लागले होते. जुन्या बाबींना तसेच उद्योगांना बाजूस करण्यासाठी या नवीन व्यवस्थेची गरज होती ती या मायरेज हॉटेल आणि मनोरंजन व्यवस्थेने (कसीनो) भरून काढली. या हॉटेलमधील सर्व मनोरंजन ठिकाणे २४ तास सुरक्षा कॅमेरे लाऊन सुरक्षित केली आहे. []

इतर माहिती

संपादन

सन १९९० ते २००३ या सालांपर्यंत सेजफ्रिड आणि रॉय ही शोजची केंद्रे होती. या दोघांचे एकत्रीकरण झाले आणि त्याचा उपयोग जादूचे प्रयोग आणि जंगली प्राण्यांच्य शो यांसाठी होऊ लागला. या शोमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका सफेद वाघाने रॉय हॉर्न यांच्यावर हल्ला केला आणि त्यात ते जखमी झाले त्यामुळे सन २००३मध्ये हा शो बंद केला.

सन १९९३मध्ये मायरेज हॉटेलच्या अधिपत्याखाली Cirque du Soleil show Nouvelle Expérience नावाचा कार्यक्रम मायरेज हॉटेलच्या वाहनतळावरील एका विभागातील तंबूत चालू केला.. त्याच वेळी सर्क यांना जवळच्याच ट्रेझर आयलंड वर रिझॉर्ट उभारणीसाठी बोलाविले. शेवटी त्यांनी लास वेगास येथे ‘मायरेज लव्ह’ चालू केले. या मायरेज लव्हमध्ये Cirque du Soleil show Nouvelle Expérience नावाचा कार्यक्रम कायम सुरू असतो.[]

सन २००४मध्ये मायरेज हॉटेल जवळील तंबू डॅनी गान्स यांनी घेतला आणि तेही मनोरंजनाचे आकर्षण झाले. डिसेंबर २००६मध्ये त्यांनी बीटल्स या थीमवर REVOLUTION ultra-lounge उघडले. किर्कुए दु सोलैल यांच्या लाइट ग्रुपने चालविलेल्या नाइटलाईफ केंद्रात सामील होण्याची ती पहिलीच वेळ होती.

सध्याची परिस्थिति

संपादन

एंकोर लास वेगासचे शो मध्ये सामील होण्यासाठी फेब्रुवारी 2009 मध्ये गान्स यांनी मिरेज सोडले.गोल्डन नुग्गेट कसिनो नंतर नोवेंबर 2012 मध्ये मिरेज कसिनो हे लास वेगासचे दुसरे गेओफ्फ हाल्स ब्लॅक जॅक हे फ्री बेट ब्लॅक जॅक पेक्षा भिन्न झाले.सन 2014 मध्ये मिरेजचा अमेझिंग रेस 24 मध्ये भाग होता की जेथे मिरेज इतर संघात “आय” हे ओळख साधन होते. []

सन २०१५मध्ये MGM रिसॉर्ट इंटरनॅशनलने मायरेज आणि इतर मालमत्तेचे स्थायी मालमत्तेत रूपांतर करून त्याचा गुंतवणूक ट्रस्ट करण्याची घोषणा केली. MGM हे मायरेज पुढे चालू राहिले.

आकर्षित करणाऱ्या बाबी

संपादन

शेगफ्राइड आणि रॉयची सिक्रेट गार्डन आणि डॉल्फिन हबिटट ! मंनी कामांनो यांनी या गार्डनचा आराखडा केला.

संध्याकाळी ७, ८ आणि ९ वाजता कृत्रिम ज्वालामुखी बनवितात आणि ते शुक्रवारी आणि शनिवारी मोकळ्या आवारात उडविले जातात.

हॉटेलचे दर्शनी भागात असलेली उंचच्या उंच पामची झाडे, पाण्याचा प्रवाह व कारंजे या गोष्टी हॉटेलची शोभा वाढवितात.

५३ फूट लांब ८ फूट उंच आकाराच्या नोंदणी मेजच्या पाठीमागील मत्स्यालयातील १००० मासे म्हणजे एक नमूना आहे.

लव्ह हा किर्कुए दू सोलैल यांचे थिएटर उत्पादनात बीटल्स यांची रीमिक्स समाविष्ट आहेत.

अमेरिकेचा गोट टॅलेंट जिंकल्यानंतर टेरी फॅक्टर हे वस्तुसंग्रहालय झाले.

“1ओक” 16000 sq.ft. न्यू यॉर्क सारखा नाईट क्लब आहे. दोन स्वतंत्र विभागात स्वतंत्र घडामोडी घडतात अशी या या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. शिवाय येथे किमान ४०० माणसे हिंडू शकतील अशी ४००० चौरस फुटांची मोकळेपणे हिंडण्यासाठी जागा आहे..[]

खेळ व्रत्त

संपादन

7 डिसेंबर 1989 – शुगर राय लियोनार्ड विरुद्द रोबर्ट दुरान 3

25 ऑक्टोबर 1990 – एवंडर होलिफील्ड विरुद्द बस्टर डगलस

18 मे 1996 –फेलिक्स त्रिणीदाद विरुद्द फ्रेद्दी पेंडलेटण

संदर्भ

संपादन
  1. ^ "सनराईझ सनसेट? कम्पेरिंग दि लास वेगास अँड मकाऊ गेमिंग मार्केट्स इन २०१०" (इंग्लिश भाषेत). २३-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "लास वेगास हॉटेल, दी मायरेज" (इंग्लिश भाषेत). २३-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "मायस्टेरी वर्कर रिकॉल्स अनसर्टन टाईम्स ड्यूरिंग शोज बर्थ" (इंग्लिश भाषेत). २३-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "डॅनी गन्स टू स्टार इन द न्यु एन्कोर थेटर इन २००९ [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). २३-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "एमजीएम रिव्होल्युशन बायो पेज [[:साचा:मृत दुुवा]]" (इंग्लिश भाषेत). 2015-09-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)