द मर्चंट ही एक इटालियन साहित्यिक परीकथा आहे. जी गियामबॅटिस्टा बेसिल यांनी त्यांच्या १६३४ मध्ये पेंटामेरोन या ग्रंथात लिहिलेली आहे.[]

सारांश

संपादन

एका व्यापाऱ्याचा मुलगा सिएनझो नेपल्सच्या राजाच्या मुलासोबत दगडफेक करत होता. त्यात राजपुत्राचे डोके दगड लागल्याने फुटते. त्याच्या वडिलांनी, परिणामांच्या भीतीने, त्याला काही पैसे, एक जादूचा घोडा आणि एक जादूचा कुत्रा देऊन लांब पाठवून देतो. संध्याकाळी, सिएनझोला एका उध्वस्त घराजवळ एक टॉवर सापडतो. दरोडेखोरांच्या भीतीने टॉवरचा मालक त्याला आत जाऊ देत नाही. सिएनझो एका घरात जातो. रात्री, त्याला समजते की ते घर तीन भुतांनी पछाडलेले आहे. त्यांच्या खजिन्याचे रक्षण करीत आहेत. सकाळी, ते त्याला ते धन देतात आणि त्याला काळजी घेण्यास बजावले. त्याला वर जाण्यासाठी शिडी दिसत नाही म्हणून तो मदतीसाठी हाक मारतो. घराचा मालक शिडी घेऊन येतो. त्याला तो खजिना सापडतो. सिएनझो त्यातून त्याचा भाग घेण्यास नकार देतो आणि निघून जातो. नदी पार करताना त्याला एका परीवर लुटारू हल्ला करताना दिसतात. तो तिला मदत करतो. परंतु बक्षीस घेण्यासाठी तिच्या राजवाड्यात जाण्यास नकार देतो.

तो प्रवास करता करता एका गावात जातो जिथे सात डोके असलेला ड्रॅगन दररोज एका मुलीला खाऊन टाकत असतो. त्या दिवशी तो ड्रॅगन तेथील राजकुमारी मेनेचेलाला खाणार असतो. तो ड्रॅगनशी लढायला जातो. त्याने त्याचे डोके कापले तरी ते परत जुडत होते. मग तो एका झटक्याने ते सर्व कापून टाकतो. त्याची जीभ पण कापतो आणि गावात लांब लांब सर्वत्र फेकून देतो.

राजाने घोषित केलेले असते की जो ड्रॅगनला मारेल तो त्याच्या मुलीशी लग्न करेल. एक नागरिक दूर दूर पडलेले सर्व डोके एकत्र करतो आणि बक्षीसावर दावा करतो. सिएनझो राजकुमारीला एक पत्र लिहितो आणि त्याच्या कुत्र्याला ते देण्यासाठी पाठवतो. राजा कुत्र्याचा पाठलाग करून सिएनझोकडे जातो. सिएनझो उघड करतो की त्या माणसाने पुरावा म्हणून आणलेली डोक्यांना जीभा नाहीयेत. राजा ते ओळखून राजकुमारीचे लग्न सिएनझोशी करून देतो.

हे सुद्धा पहा

संपादन
  • तीन कुत्रे
  • द सी-मेडेन

संदर्भ

संपादन
  1. ^ Giambattista Basile, Pentamerone, "The Merchant" Archived 2014-01-04 at the Wayback Machine.

पुढील वाचन

संपादन
  • मॅग्नानीनी, सुझान. "फॉइल्स आणि फेक्स: द हायड्रा इन गिआम्बॅटिस्टा बेसिलच्या ड्रॅगन-स्लेअर टेल, "लो मर्कांटे" चमत्कार आणि किस्से 19, क्र. 2 (2005): 167-196. 7 ऑगस्ट 2020 रोजी प्रवेश केला. www.jstor.org/stable/41388749.