पुस्तकाबद्दल

संपादन

'द बिटर चॉकलेट' हे पुस्तक पिंकी विराणी यांनी लिहिले आहे. हे पुस्तक आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा व नैतिकता या कल्पनांना आव्हान करते. हे पुस्तक लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतीच्या मौनाला वाचा फोडते. ह्या संकलपने वर आधारित हे पहिलेच उल्लेहखनीय पुस्तक भारतामध्ये प्रसिद्ध झाले आहे. अनेकदा या प्रकारचे शोषण हे त्या मुलांच्या जवळच्या व्यक्तिकडुनच घडत असते. भारतभरातून पिंकी विराणी यांनी या प्रकारच्या घटनांचा मागोवा घेउन, मुलांचे मानसोपचार तज्, डॉक्टर, वकील, पोलिस, आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने पडताळा घेतला अहे. या प्रकारच्या शोषणाला बळी पडलेल्या मुलांच्या वास्तव घटनांचा या पुस्तकात उल्लेख केलेला अहे. फक्त शोषणकर्तेच नव्हे तर समाज पण या मुलांना दाबून टाकतो. या पुस्तकात आलेले प्रसंग हे म्ध्यमवर्गीय व उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबात घडलेले खरे प्रसंग अहेत. अगदी लहानपणापासुन मुलांवर झालेल्या लैंगिक शोषणाचा इतिहास पिंकी विराणी या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न करते.

ह्या पुस्तकामध्ये, लैंगिक शोषण घडल्यास, मदतीसाठी लागणारा हेल्पलाइन नंबर व इतर सविस्तर माहिती पुरवली गेली अहे. सामान्य वाचकाने किंवा सामान्य माणसाने अशा प्रकारच्या घटनेला कसे तोंड द्यावे हे या पुस्तकात सांगितले अहे.

लेखिकेबद्दल

संपादन

पिंकी विराणी ही पत्रकार असुन ती एक लेखक व मानवी हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती अहे. तिने मोठया प्रमाणावर हिंसा आणि शोषण या विषयांचा अभ्यास केलेला असुन त्या वर साहित्य तयार केले अहे. तिच्या प्रकाशित पुस्तकात, 'अरुणाज् स्टोरी', 'डेफ हेवन',