दौलतराव गायकवाड" हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावान साथीदार होते.स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी पासून दौलतराव गायकवाड हे शिवरायांचे फक्त साथीदार नसून ,त्यांचे कौटुंबिक संबंध सुद्धा होते दौलतराव गायकवाड यांच्या मोठ्या आईसाहेब ( आत्या) शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंच्या (संभाजीराजे शहाजीराजे भोसले) पत्नी होत्या.त्यानंतर दौलतराव गायकवाड यांची मोठी बहीण शिवरायांच्या पत्नी होत्या (सक्वारबई गायकवाड).अफजलखानाच्या वधानंतर भूपाळगडाची किल्लेदारी दौलतराव गायकवाड यांच्या कडे देण्यात आली व त्यांनी ती चोखपणे पार पाडली.दौलतराव गायकवाड यांना थोरले बंधू होते ते म्हणजे विश्वासराव गायकवाड.दोघे बंधू पन्हाळा जवळ झालेल्या पेशव्यांच्या व करवीर छत्रपतींच्या युद्धात धारातीर्थी पडले.