दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघ
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. |
पुणे जिल्हा प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुढारीचे राहु (ता.दौंड) येथील बातमीदार संदीप शिवाजी सोनवणे यांची निवड करण्यात आली. त्यांना दौंड तालुक्याचा प्रथम अध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे. तर संघटनेच्या उपाध्यक्षपदी संदीप सिद्धार्थ भालेराव (पश्चिम विभाग) व विलास जयवंत कांबळे (पूर्व विभाग) या दोघांची निवड करण्यात आली आहे. तर 'पुणे प्राईम न्यूज'चे यवत येथील बातमीदार राहुलकुमार दत्तात्रय अवचट यांच्यावर सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मराठी | |
---|---|
पार्श्वभूमी ची माहिती |
पुणे जिल्हा प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली चौफुला (ता.दौंड) येथील श्री क्षेत्र बोरमलनाथ मंदिरात गुरुवारी (ता.२७) दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाची बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप व कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब काळभोर यांनी दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर केली.
यावेळी संघटनेचे राज्याचे सचिव संदीप बोडके, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, प्रभाकर क्षीरसागर, जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, हवेली तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत दुंडे, उपाध्यक्ष अमोल अडागळे, समन्वयक अमोल भोसले, रियाज शेख, राजेंद्र हजगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अशी असेल नवीन कार्यकारिणी.....
अध्यक्ष - संदीप सोनवणे, कार्याध्यक्ष - मनोजकुमार कांबळे, उपाध्यक्ष - संदीप भालेराव (पश्चिम विभाग), उपाध्यक्ष - विलास कांबळे (पूर्व विभाग), सचिव - राहुलकुमार अवचट, कायदेशीर सल्लागार ॲड.यशवंत शिंदे, प्रसिद्ध प्रमुख - विकास शेंडगे, तालुका समन्वयक - दीपक पवार, कोषाध्यक्ष - भाऊ ठाकूर, मुख्य प्रतोद- संतोष जगताप, पूर्व विभाग संघटक- मिलिंद शेंडगे, पश्चिम विभागाचे संघटक सचिन रुपनवर, महिला प्रतिनिधी - अक्षता हणमघर.....