दोस्ती
दोस्ती हा १९६४ सालचा भारतीय कृष्ण-धवल हिंदी चित्रपट असून सत्येन बोस दिग्दर्शित आहे आणि राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ताराचंद बडजात्या निर्मित आहे. ह्यात सुधीर कुमार सावंत आणि सुशील कुमार सोम्या मुख्य भूमिकेत होते आणि ही गोष्ट आहे दोन मुलांमधील मैत्रीची ज्यात एक अंध आणि दुसरा अपंग आहे. दोस्ती १९६४ सालच्या पहिल्या १० सर्वात जास्त कमाइ करणऱ्या चित्रपटांपैकी एक होता आणि बॉक्स ऑफिसवर त्याला "सुपर हिट" म्हणून घोषित करण्यात आले.[१] हा ४थ्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल झाला. १९७७ साली हा चित्रपट तेलुगू भाषेत स्नेहमच्या रूपात पुन्हा तयार करण्यात आला होता.
१९६४चा हिंदी चित्रपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
निर्माता |
| ||
वितरण |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
कथानक
संपादनदोस्ती ही रामू (सुशील कुमार) आणि मोहन (सुधीर कुमार) यांची कहाणी आहे. रामूचे वडिलांचा कारखान्यात काम करताना अपघातात मृत्यू होतो. जेव्हा कारखानदार नुकसान भरपाई देण्यास नकार देत, त्याच्या आईचा मानसिक धक्क्यामुळे मृत्यू होतो. एका अपघातात रामू जखमी होउन अपंग होतो आणि गरीब स्थीतीत मुंबईच्या रस्त्यावर उतरतो. येथे त्याला मोहन भेटतो, जो आंधळा आहे आणि अशीच दुर्दैवी कथा आहे. मोहन एका खेड्यातून आला आहे. त्याची बहीण, मीना नर्स म्हणून काम शोधण्यासाठी खेड्यातून मुंबईत स्थायिक झाली होती, जेणेकरून ती तिच्या भावाच्या उपचारासाठी पैसे कमावेल.
रामू हार्मोनिका वाजवण्यात चांगला आहे, तर मोहन एक चांगला गायक आहे. ते पथक तयार करतात आणि रस्त्याच्या कडेला गाणी गात पैसे मिळवतात. रामूला आपला अभ्यास पण संपवायचा आहे. ते दोघेही पुरेसे पैसे गोळा करतात जेणेकरून रामू शाळेत प्रवेश घेऊ शकेल. रामुचा गरीब असल्याने आणि भीक मागून पैसे मिळवल्याबद्दल त्याच्या शाळेत अनेकदा त्याची खिल्ली उडविली जाते. शाळेचे मुख्याध्यापक शर्माजी त्यांची मदत करतात आणि रामूने त्यांच्याबरोबर राहायला सुरुवात करावी आणि मोहनला सोडून द्यावे असा आग्रह धरतात.
त्यानंतर लवकरच रामू काही गुंडांशी अडचणीत सापडतो आणि चुकून त्याला पोलीस अटक करता. शर्माजी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रामूला जामीनावर सोडवतात पण एका अटीवर की तो आता शर्माजींसोबत राहील आणि मोहनशी संपर्क साधणार नाहीत. मोहन हतबल होतो आणि दुःखी गाणी गात गल्लीबोळात फिरत असतो. शर्माजी अचानक मरण पावतात आणि फी भरणे शक्य नसल्याने रामू अंतिम परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतो. हे ऐकून, तब्येत बिघडली असतानाही, मोहन पुन्हा एकदा रस्त्यावर गाऊन पैसे उभा करण्याचा निर्णय घेतो. तो यशस्वीरित्या पैसे कमावतो आणि फी भरतो. जेव्हा रामू परीक्षेत प्रथम येतो आणि जेव्हा मोहनच्या त्यागाची माहिती मिळते तेव्हा तो मोहनला दवाखान्यात माफी मागण्यासाठी धावत जातो जिथे मोहन म्हणतो की आपण त्याच्यावर कधीही रागावलो नव्हतो. या सर्वांच्या प्रेमळ मिठीत चित्रपट संपतो.
निर्माण
संपादनलक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचे बोल मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले आहेत. संगीतकार राहुल देव बर्मन यांनी चित्रपटात हार्मोनिका वाजविली आहे. दोस्ती हा लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीच्या कारकिर्दीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे कारण यामुळे त्यांना त्यांचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि चित्रपट सृष्टीमध्ये ते लोकप्रिय झाले.मोहम्मद रफी हे या गाण्यांचे मुख्य गायक आहेत आणि एक गाणे लता मंगेशकरयांनी गायले आहे.[२]
पुरस्कार
संपादन१९६४ मध्ये या चित्रपटाला १२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. १९६५ मधील १२व्या फिल्मफेर अवॉर्ड्समध्ये या चित्रपटाने ७ नामांकनांमधून ६ पुरस्कार जिंकले:
- पुरस्कार जिंकले
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - ताराचंद बडजात्या
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - लक्ष्मीकांत प्यारेलाल
- सर्वोत्कृष्ट कथा - बन भट्ट
- सर्वोत्कृष्ट संवाद - गोविंद मूनिस
- सर्वोत्कृष्ट पार्श्व गायक - "चहुंगा मैं तुझे सांज सेवारे" गाण्यासाठी मोहम्मद रफी
- सर्वोत्कृष्ट गीतकार - "चहुंगा मैं तुझे सांज सावेरे" गाण्यासाठी मजरुह सुलतानपुरी
- पुरस्कार नामांकन
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सत्येन बोस
संदर्भ
संपादन- ^ "Box office 1964". Boxofficeindia.com. 12 February 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 Jan 2012 रोजी पाहिले.
- ^ Ashok Da. Ranade (2006). Hindi Film Song: Music Beyond Boundaries. Bibliophile South Asia. p. 310. ISBN 81-85002-64-9.