देवीप्रसाद खरवंडीकर
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
डॉ. देवीप्रसाद खंडेराव खरवंडीकर (जन्म १ ऑक्टोबर १९३५): हे काव्यतीर्थ या उपाधीने गौरविले गेलेले संस्कृत साहित्यिक आहेत. त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असते. ग.दि.माडगुळकरांचे गीतरामायण आणि भा.रा.तांब्यांच्या कवितांचा त्यांनी संस्कृत अनुवाद केला आहे. देवीप्रसाद हे शास्त्रीय गायक आहेत आणि त्यांचे चिरंजीव मकरंद हे संगीताच्या मैफिलींमध्ये पेटी वाजवून साथ करतात.
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ’ज्ञानगंगा घरोघरी’ हे बोधवाक्य खरवंडीकरांनीच सुचवले होते, असे म्हणतात.[ संदर्भ हवा ] संस्कृत चर्चासत्रांच्या कामानिमित्ताने भारतात आणि जगातील कॅनडा, जर्मनीसारख्या संस्कृत भाषेचे महत्त्व जाणणाऱ्या देशांना त्यांनी अनेकदा भेटी दिल्या आहेत.
त्यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त, त्या वेळी ९५ वर्षे वयाचे असणाऱ्या नागपूरच्या ना.वा.गोखले यांनी "सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः। देवीप्रसादरूपेण शिल्पी त्वं सौरभाय हि।।'' (शिल्पकार सोन्याची कमळे निर्माण करू शकतात; परंतु देवीप्रसाद हा शिल्पकार असा आहे की, त्याने त्या सुवर्णकमळांना सुगंध दिला आहे.) असे उद्गार काढले होते.[ संदर्भ हवा ]
शिक्षण आणि कारकीर्द
संपादन- शालान्त परीक्षेपासून ते एम.ए.च्या परीक्षेपर्यंत सर्वत्र पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण(तीसहून अधिक पारितोषिके)
- संगीतामध्ये पदविका
- संस्कृत भाषेचा पन्नासाहून अधिक वर्षांचा व्यासंग
- गुञ्जारव या संस्कृत त्रैमासिकाचे ४५हून अधिक वर्षे संपादक (१९८६पासून मुख्य संपादक).
- २० स्वतंत्र संस्कृत ग्रंथाचे लेखक
- २५ ग्रंथांचे संपादन
- अनेक शोधनिबंधाचे लिखाण
- दोनशेहून अधिक संस्कृत कविता
- दीडशेहून अधिक संपादकीय लेख
- पाच संस्कृत एकांकिकांचे लेखन
- पन्नासहून अधिक पीएच.डी.च्या प्रबंधाचे परीक्षक
- महाराष्ट्राच्या शालान्त परीक्षा मंडळाचे सदस्य
- पुणे आणि अन्य विद्यापीठांच्या अभ्यासक्रम मंडळांवर सदस्यत्व
- राष्ट्रीय चर्चासत्रांत सहभाग
- आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण
- ’वाईज अदरवाईज’ या सुधामूर्ती यांच्या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठीचे मुख्य संपादक
- संस्कृत लेखनाबद्दल दिल्लीच्या एन.सी.आर.टी. संस्थेतर्फे दोन वेळा प्रथम पारितोषिक
- दिल्ली संस्कृत अकादमीची पाच वेळा बक्षिसे
- संस्कृत नाट्यलेखनाबद्दल आकाशवाणीचे दोन वेळा प्रथम पारितोषिक
- महाराष्ट्र सरकारकडून संस्कृत पंडित ही पदवी, वगैरे वगैरे.
मानसन्मान आणि पुरस्कार
संपादन- कै.आचार्य हर्डीकर पुरस्कार
- उत्तर प्रदेश संस्कृत अकादमीचा संस्कत पत्रकारितेसाठी दिला जाणारा महर्षी नारद पुरस्कार
- दिल्ली संस्कृत अकादमीचा समस्यापूर्तीसाठी पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार
- बालसाहित्य राष्ट्रीय पुरस्कार
- भारताच्या राष्ट्रपतींकडून ’बादरायण व्यास’ पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारकडून संस्कृत पंडित ही पदवी
- शंकराचार्यांची मानपत्रे
- स्वरानंद प्रबोधिनीचा स्वरानंद रत्न पुरस्कार
- ज्ञानप्रबोधिनीचा पुरस्कार(संस्कृत ताम्रपट), आणि
- बंगाल संस्कृत असोसिएशनकडून काव्यतीर्थ ही पदवी