देवळी विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
देवळी विधानसभा मतदारसंघ - ४५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, देवळी मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका, वर्धा तालुक्यातील अजनी, सेवाग्राम, वायगांव, वायफड ही महसूल मंडळे आणि हिंगणघाट तालुक्यातील कानगांव आणि अलीपूर ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. देवळी हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रणजित प्रतापराव कांबळे हे देवळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनदेवळी विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- वर्धा तालुका : अजनी, सेवाग्राम, वायगांव आणि वायफड महसूल मंडळे
- हिंगणघाट तालुका : कानगांव आणि अलीपूर महसूल मंडळे
- देवळी तालुका
देवळी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादनवर्ष | आमदार | पक्ष | |
---|---|---|---|
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६) | |||
१९५२[n १] | शंकर विठ्ठल सोनावणे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
महादेव तुकाराम ठाकरे | |||
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०) | |||
१९५७ ते १९६२ मतदारसंघ रद्द | |||
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून) | |||
१९६२ ते २००९ : पुलगाव विधानसभा मतदारसंघ | |||
२००९ | रणजित प्रतापराव कांबळे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२०१४ | |||
२०१९ | |||
२०२४ | निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
देवळी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
रणजित प्रतापराव कांबळे | काँग्रेस | ५८,५७५ |
रामदास चंद्रभान तडस | भाजप | ५४,८२९ |
DR. VIJAY GOVINDRAO RAUT | बसपा | १५७५७ |
GHODMARE SHASHANK GANGADHARRAO | अपक्ष | १०८३४ |
AAGLAVE VIJAY NAGORAO | अपक्ष | ३९३३ |
SHANKAR KAMALRAO BAWANE | अपक्ष | १८३२ |
YASHWANT NAMDEORAO ZADE | माकप | १७९७ |
SHOBHA VISHWANATH POPATKAR | अपक्ष | ६०४ |
KAMBLE PRAVIN RAMESH | अपक्ष | ५०९ |
विजयी
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/>
खूण मिळाली नाही.