राजकीय कारकीर्द

  • गेल्या ३० वर्षांपासून 'भारतीय जनता पक्षाच्या' निष्ठावंत कार्यकर्त्या
  • महाविद्यालयीन जीवनात "जनरल सेक्रटरी" म्हणून काम सांभाळले .
  • सन १९९७ ते सन २०१४ या कालावधीत ३ वेळा नाशिक महानगरपालिका "नगरसेवक" म्हणून उल्लेखनीय काम
  • सन २००९ ते सन २०१२ या कालावधीत नाशिक महानगरपालिका "उपमहापौर" म्हणून भरीव कामगिरी
  • सन २००४ ते २०१३ या कालावधीत महिला मोर्चा प्रदेश चिटणीस पद भूषविले.
  • अभ्यासू व परखड नेतृत्व गुणांमुळे विधानसभा पक्ष प्रतोद पदी निवड
  • महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या इतर मागासवर्गीय समिती व उपविधान समिती सदस्या
  • सन २०१५ च्या तृतीय (हिवाळी) अधिवेशनातील सभाध्यक्ष तालिकेवर नियुक्ती
  • सन २०१९ मध्ये नाशिक विधानसभा (मध्य) मतदार संघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड
  • लोकप्रिय व अभ्यासू आमदार म्हणून ख्याती
प्रा.सौ.देवयानी सुहास फरांदे विद्यमान आमदार

शिक्षण एम.एस.सी मायक्रो बायोलॉजी,पुणे विद्यापीठ ,

पी.एच.डी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

उल्लेखनीय कामे

  • नाशिक औद्योगिक क्षेत्र विकासासाठी उद्योजकांना सवलतीत वीज पुरवठा मिळण्यासाठी विधानभवनात आवाज उठविला.

आमदार देवयानी फरांदे यांनी धान्य वितरणाचा 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणून दिला त्याची दखल तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय गिरीश बापट यांनी घेत यंत्रणेतील दोष दूर करत धान्य पुरवठा सुरळीत केला.

सामाजिक योगदान

  • वुमन्स फोरेन आणि दुर्ग विकास महिला बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करून महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्नशील

पुरस्कार

  • नाशिक सिटीझन फोरमतर्फे "आदर्श नगरसेविका" पुरस्काराने सन्मानित
  • महात्मा फुले समाज विकास संस्था, नाशिक यांच्यावतीने "दिव्य ज्योती" पुरस्काराने सन्मानित