दीन मुहम्मद
वपोीूगब
दीन मुहम्मद (किंवा शेख दीन मुहम्मद; जन्म १७५९ पाटणा; मृत्यू १८५१ ब्राइटन, इंग्लंड) एक भारतीय प्रवासी, शल्यचिकीत्सक, व व्यापारी होते. इंग्रजी भाषेत लिहीणारे ते पहिले भारतीय होते. १७९४ साली त्यांनी द ट्रॅव्हल्स ऑफ दीन मुहम्मद (दीन मुहम्मदच्या सफरी; मराठी अनुवाद उपलब्ध नाही) या नावाखाली आत्मचरित्र प्रकाशित केले. त्यांनी इंग्लंडमध्ये १८१० साली हिंदुस्थानी कॉफी हाऊस नावाचे उपहारगृह उघडले. ते त्या देशातील पहिले भारतीय उपहारगृह होते. इंग्लंडमधल्या ब्राइटन शहरात दीन मुहम्मद यांचे थडगे आहे.