दीक्षाभूमी (चंद्रपूर)
दीक्षाभूमी हे चंद्रपूर शहरातील आणि नागपूरच्या दीक्षाभूमीखालोखाल भारतातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख बौद्ध तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी आपल्या ३ लाखापेक्षा अधिक अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तत्पूर्वी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे १४ व १५ ऑक्टोबर १९५६ रोजी अनुक्रमे ५ लाख व २ लाख अशा एकूण ७ लाखावर अनुयायांनाही दीक्षा दिली होती. त्यामुळे या दोन्ही स्थळांना ‘दीक्षाभूमी’ म्हणले जाते.[१]
बाबासाहेबांनी चंद्रपूरला ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे 'डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय' सुरू आहे.[२] आणि काही कालावधीनंतर या दीक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जाणार आहे. वर्षभर बौद्ध अनुयायी येथे भेटी देत असतात, परंतु दरवर्षातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाला म्हणजेच १४, १५ व १६ ऑक्टोबर (अनुप्रवर्तन दिनी) रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध लोक येथे बुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.[३][४]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "चंद्रपूरची दीक्षाभूमी झाली पावन". Lokmat. 2016-10-17. 2018-05-10 रोजी पाहिले.
- ^ "Dr.Ambedkar College". www.dacchanda.ac.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-11 रोजी पाहिले.
- ^ User, Super. "CM - दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी १,९८,१५,३०० रू. निधीला मंजूरी". chandamirror.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-10 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी - Maharashtra | DailyHunt". DailyHunt (इंग्रजी भाषेत). 2018-05-10 रोजी पाहिले.