दिवाकर कृष्णाजी डेंगळे

दिवाकर कृष्णाजी डेंगळे(१९ मार्च, १९२८ - फेब्रुवारी २२, २००७:पुणे, महाराष्ट्र, भारत) हे महाराष्ट्रातील नावाजलेले कलाध्यापक आणि चित्रकार होते. ते पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे संस्थापक, प्राचार्य होते.

दिवाकर डेंगळे
पूर्ण नावदिवाकर कृष्णाजी डेंगळे
जन्म मार्च १९, १९२८
मृत्यू फेब्रुवारी २२, २००७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला, कलाअध्यापन
वडील कृष्णाजी डेंगळे

डेंगळे यांचा जन्म मार्च १९, १९२८ रोजी झाला. पुण्यात नूतन मराठी विद्यालयात शिकत असल्यापासून त्यांना चित्रकलेची गोडी होती. तेव्हा शाळेतील चित्रकलाशिक्षकांकडून त्यांना चित्रकलेचे प्राथमिक धडे मिळाले.