मुख्य मेनू उघडा
दिलीप जोशी

दिलीप जोशी (२६ मे, १९६८ - ) हे एक चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. ते मुख्यतः विनोदी भूमिका करतात. तारक मेहता का उलटा चष्मा यातील जेठालाल चंपकलाल गडा या पात्राची भूमिका त्यांनी केली आहे.गेल्या नऊ वर्षांपासून या विनोदी मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवले. यातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या परिचयाची झाली आहे. जेठालाल, दयाबेन यांसारख्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेता दिलीप जोशी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत जेठालाल गडा ही व्यक्तिरेखा साकारली. मुळात दिलीप यांना बरेचजण त्यांच्या खऱ्या नावापेक्षा ‘जेठालाल’ याच नावाने जास्त ओळखतात.[१]

वैयक्तिक जीवनसंपादन करा

दिलीप जोशी यांचा जन्म पोरबंदरमध्ये एका गुजराती कुटुंबात झाला. हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. बी कॉम करत असताना त्यांना दोन वेळा इंडियन नॅशनल थिएटरकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्या्चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यांच्या पत्‍नीचे नाव जयमाला जोशी आहे.[ संदर्भ हवा ]

करिअरसंपादन करा

दिलीप जोशी यांना या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. मात्र याआधीही त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सलमान खान आणि माधुरी दीक्षित या जोडीच्या ‘हम आपके है कौन’ या सिनेमात दिलीप जोशीने एक भूमिका केली होती. या सिनेमातील इतर भूमिकांप्रमाणे त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली होती.दिलीप एका महिन्यात जवळपास 25 दिवस शुटींग करतात. त्यामुळे महिन्याला त्यांच्या मानधनाचा आकडा जवळपास १३ ते १५ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो.[२]

संदर्भसंपादन करा