दारुहळद हिचे (शास्त्रीय नाव: Berberis aculeata वैकल्पिक नाव: Berberis aristata) व कूळ बरबेरीडेसी आहे .ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. दारुहळदीचा वृक्ष लहान आणि काटेरी असतो. याचे कांड(खोड) फिकट उदी रंगाचे असून आतून पिवळे असते. ते चिवट आणि सहज न तुटणारे असते. पाने निळसर, काटेरी आणि लंबाकृती असतात. मार्च ते मे या काळात झाडाला पिवळी फुले येतात.

दारुहळद
Berberis aristata fruits
दारूहळदीची फळे

नैसर्गिक आढळ

संपादन

नरम रेतीयुक्त जमिनीत, थंड हवेच्या ठिकाणी, हिमालयाच्या पहाडांवर, आसामात, निलगिरी पर्वतावर आणि छोटा नागपूर विभागात. बिब्ब्याच्या झाडाच्या दक्षिणेला व दारूहळदीच्या उत्तरेला वारूळ असेल तर पूर्वेला पाणी लागते.

उपयोग

संपादन

क्विनाईनपेक्षा हे औषध जास्त गुणकारी आहे.[ संदर्भ हवा ] हाडीताप, डेंगी, कावीळ, प्लीहादोष, यकृतविकार, रक्ती मुळव्याध आणि डोळ्यांच्या विकारांवर दारुहळदीचा औषधोपचार करतात. दारुहळदीपासून रसांजन आणि रसोत या नावाची औषधे बनतात.

संदर्भ

संपादन

बाह्यदुवे

संपादन