दानिश सिद्दीकी
दानिश सिद्दीकी (१९८० - १६ जुलै २०२१) हे मुंबईतील भारतीय फोटो-पत्रकार होते. रॉयटर्सच्या फोटोग्राफी स्टाफचा भाग म्हणून त्यांना २०१८ साली पुलित्झर पुरस्कार मिळाला. २०२१ मध्ये पाकिस्तानच्या सीमारेषेजवळील अफगाण सुरक्षा दले आणि तालिबानी लढाऊ यांच्यात झालेल्या चकमकीचे कव्हर करताना ते मारले गेले.
Indian photojournalist (1983-2021) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | दानिश सिद्दीकी | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | मे १९, इ.स. १९८३ नवी दिल्ली | ||
मृत्यू तारीख | जुलै १६, इ.स. २०२१ Spin Boldak | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मारेकरी | |||
चिरविश्रांतीस्थान | |||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
नियोक्ता |
| ||
पुरस्कार |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
सिद्दीकी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दूरचित्रवाणी बातमीदार म्हणून केली. २०१० मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय बातमी एजन्सी रॉयटर्समध्ये इंटर्न म्हणून प्रवेश केला. सिद्दीकी यांनी २०१६- २०१७ सालातील मोसुलची लढाई, एप्रिल २०१५ मधील नेपाळ भूकंप, २०१९-२०२० मध्ये रोहिंग्या नरसंहारातून उद्भवलेल्या निर्वासित संकटावरील बातम्या कव्हर केल्या होत्या. २०२० मधिल हाँगकाँगचा निषेध, दिल्ली दंगली आणि कोविड -१९ साथीचा रोगाच्या बातम्यांसह दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि युरोपमधील इतर बातम्या कव्हर केल्या होत्या. २०१८ मध्ये, रोहिंग्या शरणार्थी संकटाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी रॉयटर्सच्या फोटोग्राफी स्टाफचा भाग म्हणून फीचर फोटोग्राफीसाठी त्यांना सहकारी अदनान अबीदी यांच्यासमवेत पुलित्झर पुरस्काराने संन्मानीत करण्यायत आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय होते. २०२० च्या दिल्ली दंगलीच्या वेळी त्यांनी हस्तगत केलेला एक फोटो रॉयटर्सने २०२० च्या परिभाषित छायाचित्रांपैकी एक म्हणून दर्शविला होता. ते भारतात रॉयटर्स पिक्चर्स टीमचे प्रमुख होते.
सिद्दीकी १६ जुलै २०२१ रोजी कंदारमधील स्पिन बुलडाक येथे अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात झालेल्या चकमकीच्या वेळी वरिष्ठ अफगाण अधिकाऱ्यांसह ठार झाले.