दादा चांदेकर
शंकर विष्णु उर्फ दादा चांदेकर (१९ मार्च, इ.स. १८९७:कोल्हापूर, महाराष्ट्र - २७ जानेवारी, इ.स. १९७६:पुणे, महाराष्ट्र) एक मराठी संगीत दिग्दर्शक होते.
त्यांचे वडील मिरजेच्या राजेसाहेबांकडे संगीतकार म्हणून नोकरीस होते. दादा चांदेकर वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे त्यांनी मिरजेतील संगीतशिक्षक नीलकंठबुवा जंगम यांचेकडून संगीतशिक्षण घेतले. चांदेकर वयाच्या बाराव्या वर्षीच कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी किर्लोस्कर कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर बलवंत संगीत मंडळी, विश्वनाथ संगीत मंडळी, इ. नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते. त्यांनी १३ हिंदी आणि २७ मराठी चित्रपटांना संगीत दिले.
१९३१ नंतर चांदेकरांनी सातार्याला संगीतशिक्षक म्हणून २-३ वर्षे शिकविण्या केल्या. नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. हंस पिक्चर्सच्या मा. विनायकदिग्दर्शित ब्रम्हचारी या यशस्वी चित्रपटातील चांदेकरांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या हे मीनाक्षीने गायिलेले गाणे विशेष प्रसिद्ध झाले. जय मल्हार या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या लावणीप्रधान संगीत चांदेकरांचे होते.
दादा चांदेकर हार्मोनियमवादक होते. पुणे आकाशवाणीवर संगीतदिग्दर्शक आणि संगीतपरीक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.
संगीत असलेली मराठी नाटकेसंपादन करा
- अशी रंगली रात्र पैजेची
- काळे गोरे
- जीव सरला पीळ उरला
- ब्रह्मचारी
संगीत असलेले मराठी/(हिंदी) चित्रपटसंपादन करा
- अमृत (१९४१)
- अर्धांगी
- कालियामर्दन (१९३५)
- गरिबांचे राज्य (१९४७)
- गुरूची विद्या गुरूला (१९५८)
- घर की रानी (१९४०, हिंदी)
- छाया
- जय मल्हार (१९४७)
- ज्वाला (१९३८, हिंदी)
- देवता (१९३९, हिंदी)
- पहिली मंगळागौर (१९४२, प्रसिद्ध गाणे - नटली चैत्राची नवलाई - लता मंगेशकरांनी अभिनयासकट गायलेले पहिले चित्रपटगीत, सहअभिनेत्री-सहगायिका - स्नेहप्रभा प्रधान)
- पुरुषाची जात (१९५८)
- मोरूची मावशी (१९४८)
- ब्रॅंडीची बाटली (१९३९)
- ब्रह्मघोटाळा
- ब्रह्मचारी (१९३८)
- लपंडाव
- लग्न पहावं करून (१९४०)
- लडाई के बाद (१९४३, हिंदी)
- सासरमाहेर
- स्वराज्य सीमेवर (१९३७)