आडनाव :- दळवी, क्षत्रिय मराठा. वंश :- परमार राजपूत वंश मूळ गादी (राज्य) :- धार, मध्य प्रदेश. अन्य गादी :- लक्ष्मीपूर(लखीमपूर) इतर गाद्या :- पालवणी, सोवेली, दाभोळ, पालगड. अन्य गावे :- हंगे ,सोनेवाडी, फणसवळे (रत्‍नागिरी ) मुर्शी व तेर्ये (संगमेश्वर), कणगवली (लांजा ), कोकरे (चिपळूण), खेड व मंडणगड गुहागर (चिखली) तालुक्यातील काही गावे. खेडे , मालेवाडी ( शाहूवाडी) , आरळे तसेच सातवे तर्फ सावर्डे ( पन्हाळा ) घराणी आहेत. कुलदेव :- महादेव. कुलदेवता :- तुळजाभवानी (तुळजापूर) देवक :- तलवारीची धार किंवा पाच प्रकार पाने (पंचपल्लव), पानकणीस गोत्र :- वशिष्ठ, वास्तव्य :- महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजराथ.

दळवी हे लोड्रा राजपूत असून, लोडोर्वा (राजस्तान) येथे त्यांचा उगम आहे. परंतु देवराज भाटी या राजपूत योद्याने त्यांचा प्रदेश जिंकला. नंतर सन १०२५ मध्ये मुस्लीमानी त्यांचे राज्य जिंकले त्यामुळे ते दक्षिणेत आले. त्यानी १२ व्या शतकात दळवी हे सद्याचे आडनाव धारण केले व देवगिरीच्या यादवांच्या राज्यात सेनाप्रमुख (दलपति) झाले. त्यांचा गुजराथ राज्यात अंमल होता. यादवांचे राज्य तेराव्या शतकाच्या अखेरीस नष्ट झाल्यावर दळवी बहामनी राज्यात घोडदळाचे प्रमुख झाले. इतिहासप्रसिद्ध जसवंतराव दळवी हे पालवणीचे राजे होते. रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालवणी गावी त्यांची राजधानी होती. जसवंतराव दळवी व श्रृंगारपूरचे राजेसुर्वे यांचे फार सख्य होते. मुघल कालखंडात त्यांचा अंमल दाभोळ प्रांतावर होता. पालवणी, सोवेली,विन्हेरे, शिसवणे, विन्हेरे (रायगड),ताम्हाणे, फणसवळे, अहिवंतवाडी,ही त्यांची प्रमुख गावे आहेत. दळवी व त्यांचे वंशज छ. शिवाजी महाराजांच्या कालखंडात कोकणातील देशमुख, खोत होते. सुरतेची लूट व अन्य अनेक स्वाऱ्यांमध्ये व शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मोहिमेत दळवी कुळाने अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. सन १६८० ते १७०७ या कालखंडात दळवी सावंतवाडी संस्थानात जहागिरदार होते. बागलाणात दळवी नावाचा एक मोगल सुभेदार होता पण तो वारंवार बंड करून स्वतंत्र बाण्याने राज्य करीत असे म्हणून औरंगजेबाने बागलाण जिंकून दळवी सुभेदाराला सक्तीने मुसलमान बनविले व त्याला दिल्लीचा सैन्य प्रमुख केले. अलीकडील काळात ब्रिगेडिअर जॉन दळवी (बामणोली), कर्नल दळवी (बामणोली - सद्या वास्तव्य देवरूख, मधुकरराव दळवी, सदस्य रत्‍नागिरी कृषि उत्पन्न बाजार समिती, सुधीर दळवी (अभिनेता), शिवाजीराव दळवी (डोंबिवली मराठा समाजाचे संस्थापक मूळचे फणसवळे गावचे व सध्या वास्तव्य वळके तालुका रत्‍नागिरी) गुहागर (चिखली) येथे उपसरपंच श्री सुभाष दळवी हे कार्य रत आहेत इत्यादी दळवी बांधव सुप्रसिद्ध आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील खेडे व मालेवाडी व पन्हाळा तालुक्यातील आरळे तसेच सातवेतर्फ सावर्डे याठिकाणी दळवी यांचे सरकार घराणी आहेत. चारही गावातील या घराण्याचा राजकीय नावलौकिक आहे. दळवी घराणे मूळचे उच्च परमार राजपूत कुळातील असल्याने पवार कुळातील बने, अधटराव(पवार), नाईक निंबाळकर, पटेल सावंत (फोंडा व परिसरातील अनेक गाव) हे सर्व एकाच कुळातील आहेत.दलपति वरून आपल अड़नाव दळवी आहे आणि छत्रपतिंनी आपल्याला दलपती ही उपमा दिली होती. अहमदनगर जिल्ह्यातील हंगे या गावाची पाटीलकी दळवींकडे होती. हंगे या गावामध्ये दळवींची बरीच घरे आहेत.नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात विंचूर दळवी गाव आहे तिथे मोठ्या प्रमाणावर दळवी आहेत. दळवी बांधव नगर जिल्ह्यात देवदैठण, सोनेवाडी, अरणगाव, श्रीगोंदा इत्यादी विविध गावांमध्ये स्थाईक झाले. सोनेवाडी गावाची पाटीलकी सुद्धा दळवी घराण्याकडे होती. आजही दळवी पाटलांचा वाडा तिथे पहावयास मिळतो. तसेच भोर तालुक्यातील नसरापूर गावात ही बरेच दळवी कुटुंबीय आढळून येतात. {कोकरे गावातुन स्थलांतरित झालेले गुहागर चिखली येथील दळवी घराणे} दळवी घराणे हे शुरवी घरण्यापैकी एक हे घराणे (१६६६) व्याडेश्वर नगरीत आले म्हणजे गुहागर चिखली या क्षेत्रात आले ते त्याकाळी स्वराज्यात दलपति होते. यसुबाईनच्या सांगण्यावरून पिनाजी महालोजी दळवी हे व्यडेश्वर (गुहागर चिखली)नगरात आले. कारण संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर गुहागर प्रांत असुरक्षित होता तेव्हा पिनाजी महालजी दळवी यांना गुहागर प्रांताची सौरक्षणाची जबाबदारी महाराणी येसुबाईंनी दीली. तेव्हा परकीय आक्रमणात पिनाजी दळवी यां वीर मरण आले त्यानंतर त्यांचा पुत्र बाबाजी पिनाजी दळवी यांनी स्वताच्या आबांनचा प्रतिशोध पुर्ण केला.