दत्तात्रेयाचे चोवीस गुरू
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अवधूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ताने चोवीस गुरू केले अशी भागवत नावाच्या ग्रंथात कथा आहे, असे सांगितले जाते.
ते गुरू आणि त्यापैकी प्रत्येकापासून घेतलेले गुण अनुक्रमे असे :-
१ पृथ्वी-क्षमावृत्ती व परोपकारित्व, २ वायू-निर्लेपता, ३ आकाश-सर्वत्र व्यापून असंग राहणे, ४ उदक-स्वच्छता आणि पवित्रता, ५ अग्नी-तेजस्विता, उपयोग करून घेणारा भेटेल त्याप्रमाणे होणे, ६ चंद्रमा-आत्मा अविनाशी आहे, विकार देहाला असतात हे ज्ञान, ७ सूर्य-भेदाभेदशून्यत्व, ८ कपोत-अतिआसक्ती नाशास कारण होते ही जाणीव, १३ हत्ती-विषयलंपट झाले असता नाश होतो हा धडा, १४ मधुपा (मधुमक्षिका) - उपभोग न घेता केलेला संचय नष्ट होतो हे सत्य, १५ हरीण-नादमोहित झाले असता नाश होतो हा अनुभव, १६ मीन-रसना ताब्यात ठेवतां आली नाहीं तर मरण ओढवते हे ज्ञान, १७ पिंगला (पक्षी) -प्रियवस्तूचा त्याग सहन करण्याची क्षमता, १९ बाल-चिंताशून्यता, २० कुमारी-एकाकी राहण्याची शक्ती, २१ शुरकृत (??) -चित्ताची एकाग्रता, २२ सर्प-संगरहित, एकट्याने संचार करणे योग्य असणे, २३ ऊर्णनामि (कोळी)- एकटा ईश्वर जगत कसे निर्माण करतो व त्याचा कसा संहार होतो हे ज्ञान आणि २४ सुपेशकृत (मिंगुरटी ??)- ध्यानसामर्थ्य. --- संदर्भ : भागवत स्कंध ११ अ. ६-२४.
मूळ श्लोक :
(अ) भागवतातातील एकादशस्कंधातला ७ वा अध्याय -
पृथिवी वायुराकाशमापोऽग्निचंद्रमा रविः। कपोतोजगरः सिंधुः पतंगो मधुकृद्गजः ।।३३।। मधुहा हरिणो मीनः पिंगला कुररोऽर्भके। कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत ।।३४।।
अर्थ : गुरू सांगेन अशेष। संख्याप्रमाण चोवीस। त्यांची नांवें तूं परिस। सावकाश सांगेन ।।४६।। पृथ्वी वायु आकाश। अग्नि आप शीतांश। सातवा तो चंडांश। कपोता परिस आठवा।।४७।। अजगर सिंधु पतंग। मधु मक्षिका गज भृंग। हरिण मीन वेश्या चांग। नांवें सुभग पिंगला।।४८।। टिटवी आणि लेकरूं। कुमारी आणि शरकारु। सर्पकांतणी पेशस्करू। इतुकेन गुरू चोवीस।।४९।।
(आ) महानुभावी एकादशस्कंधात पुढील गुरू सांगितले आहेत :- पृथ्वी पवनुः आकाश जळ हुताशनुः कुमोद-बंधु भानुः कपोता अजगुरूः सींधु पतंगु मधुकरूः गजु मधु वा कृष्णसारूः मीनु पींगळा कुरुरुः बाळकु कुमारीः सेलारा फणिमौळीः उर्णनाभि झील्लि।
(ई) उद्धवगीतेत - पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, सिंधु, पतंग, मधमाशी, गज, भृंग, हरीण, मीन, पिंगळा (वेश्या), टिटवी, लेकरू, कुमारी, शरकार, सर्प, ऊर्णनाभि, भिगुरटी. (२६६-६८)