थॉमस अल्वा एडिसन

(थॉमस अल्व्हा एडिसन या पानावरून पुनर्निर्देशित)

थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७१८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेचा दिव्याच़ा शोधलावला. तसेच त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच . फेब्रुवारी ११ इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झ़ाला. ते फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ" आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली. एडिसन घरी बसले. त्याचा उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराचा पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याच़े काम केले. १८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उच़लून त्याने त्याच़े प्राण वाच़वले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझ़ी यांच़ा होता. एडिसनच़े उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझ़ीने त्याला आगगाडीचा तारायंत्राच़े शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरच़े काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात मग्न असल्यामुळे एडिसनला रात्री झ़ोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच़ घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले. त्याचा मित्र महान तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स यांनी थॉमस एडिसन चा तीव्र विरोध केला. वादामुळे डीसी किंवा एसी करंट चांगले आहे की नाही. त्याने एसी करंटने दोन कुत्र्यांना इलेक्ट्रोसिव्ह देखील केले त्याचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी.

थॉमस अल्वा एडिसन
A Day with Thomas Edison (1922)

एकाधिकार

संपादन

थाॅमस अल्वा एडिसनवरील मराठी पुस्तके

संपादन
  • एडिसन चरित्र (ह.अ. भावे)
  • एडिसनची आगळी कहाणी (बाल कादंबरी, लेखक - सुधाकर भालेराव)
  • थॉमस अल्वा एडिसन (चरित्र, लेखक - अनिल गोडबोले)
  • थॉमस आल्वा एडिसन (मदन पाटील)

बाह्य दुवे

संपादन