ग्रामोफोन
ग्रामोफोन (इंग्लिश: gramophone ;), हे एका चक्राकार तबकडीवर चिरा पाडून ध्वनिमुद्रित केलेल्या आवाजाचे पुन्हा ध्वनीत रूपांतर करणारे उपकरण होते. ते प्रामुख्याने इ.स. १८७० च्या दशकापासून इ.स. १९८० च्या दशकापर्यंत प्रचलित होते. या तबकड्या लाखेच्या किंवा तत्सम पदार्थाच्या असत. याउलट, फोनोग्राम म्हणजे आवाजाचे तबकडीवर ध्वनिमुद्रण करणारे उपकरण.
निर्मिती
संपादनग्रामोफोनाची प्रथम निर्मिती थॉमस अल्वा एडिसन याने केली.[१] ग्रामोफोनाचा प्रथम प्रयोग एडिसनाने मेरी हॅड ए लिट्ल लॅंब हे सुप्रसिद्ध इंग्रजी बालगीत स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून केला. ध्वनिमुद्रणाची ही आद्य पद्धत होय. एका दंडगोलाच्या बाजूवर विशिष्ट लेप देऊन, त्यावर मुद्रित करण्याच्या ध्वनीच्या कंपनांच्या अनुसार चढउतारांचे मुद्रण व त्या चढउतारांच्या अनुसार ध्वनीचे पुनरुत्पादन करण्याची ही पद्धती आहे.
ग्रामोफोनाच्या प्राथमिक अवस्थेत ध्वनिमुद्रणासाठी दंडगोलाकृती ड्रम वापरण्यात येत असे, परंतु त्यानंतर त्याऐवजी तबकडीचा वापर करण्यात येऊ लागला. या प्रकारात तबकडीच्या दोन्ही पृष्ठभागांवर ध्वनिमुद्रण केले जात असे.
बाह्य दुवे
संपादन- द बर्थ ऑफ रेकॉर्डिंग इंडस्ट्री (ध्वनिमुद्रण उद्योगाची जन्मकहाणी) - ले.: अॅलन क्यॉनिग्सबेर्ग (इंग्लिश मजकूर)
- मारिओ फ्रात्सेत्तो याचे 'फोनोग्राफ व ग्रामोफोन दालन' (इंग्लिश मजकूर)
- ^ Bhopal, Swadesh (2023-11-20). "इतिहास के पन्नों में 21 नवंबरः दिलचस्प है ग्रामोफोन की कहानी". www.swadeshnews.in (हिंदी भाषेत). 2024-07-07 रोजी पाहिले.