थॅलसीमिया

थॅलेसीमिया आजार म्हणजे काय
(थॅलसीमीया या पानावरून पुनर्निर्देशित)

दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसीमिया दिन साजरा केला जातो. हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार आहे, जे आई वडीलां पासून मुलांना येतो. या आजाराचे लक्षण जवळपास 3 महिन्या नंतर कळून येतात. थॅलेसीमिया दिन साजरे करण्याचा मुख्य हेतू लोकांमध्ये रक्ताशी निगडित या गंभीर आजाराबद्दल जन जागृती करणे आहे.

आई वडिलांकडून वारसा मिळालेल्या या आजाराची एक विचित्रता आहे की ह्या आजाराचे कारणं माहिती असून सुद्धा या पासून वाचता येणे अशक्य आहे. खेळण्याचा बागडण्याचा वयामध्ये लहान मुलांना दवाखान्यात रक्त पेढींच्या भोवती सारख्या फेऱ्या माराव्या लागतात. त्यांच्या कुटुंबीयांचा मन:स्थितीच विचार करा कसे वाटत असणार त्यांना. सततचे आजारपण, कोमजलेला चेहरा, वजन कमी होणे, असे अनेक लक्षण मुलांमध्ये हा आजार झाल्यास दिसून येतात. चला तर मग जाणून घेऊ या 8 मे रोजी जागतिक थॅलेसीमिया या गंभीर आजाराबद्दल माहिती, त्याचे लक्षण आणि प्रतिबंधित उपाय

थॅलेसीमिया आजार म्हणजे काय -

हा एक असा आजार आहे जो मुलानं मध्ये जन्मापासूनच असतं. आणि जन्मल्याच्या 3 महिन्यानंतर त्याचे लक्षण दिसून येतात. तज्ज्ञ सांगतात की या आजारामध्ये बाळाच्या अंगात रक्ताची कमी होऊ लागते. जेणे करून त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता येते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होतं जे पुढच्या आयुष्यात हृदयासाठी प्राणघातक ठरू शकतं.


थॅलेसेमियाची लक्षणे -

  • सततचे आजारपण
  • सर्दी, पडसं होणे
  • अशक्तपणा आणि उदासीनता जाणवणे
  • वयानुसार शरीराची वाढ न होणे
  • अंग पिवळे होणे, दात जास्त बाहेर येणे
  • श्वास घ्यायला त्रास होणे
  • अतिसंक्रमण होणे

असे अनेक लक्षण दिसून येतात.

थॅलेसीमिया पासून बचाव कसे करावे -

  • लग्नाच्या आधीच स्त्री आणि पुरुषाची संपूर्ण रक्ताची तपासणी करणे.
  • गरोदरपणात सुद्धा तपासणी करवून घेणे.
  • रुग्णाचे हिमोग्लोबिनचे स्तर 11 -12 राखण्याचे प्रयत्न करावे.
  • वेळच्या वेळी औषधे घेणे आणि निदान पूर्ण करणे.

थॅलेसीमिया एक प्रकाराचा रक्ताशी निगडित आजार आहे. ह्याचे 2 प्रकार असतात. जन्म घेणाऱ्या बाळाच्या आई वडिलांचा जीन्स मध्ये किरकोळ (मायनर) थॅलेसीमिया असेल तर बाळाला जास्त प्रमाणाचे थॅलेसीमिया होऊ शकतो. जे जीवघेणे असू शकते. आणि बाळाच्या आई वडिलांमध्ये कोणाला एकालाच कमी प्रमाणाचे थॅलेसीमिया असल्यास बाळाच्या जीवाला काही धोका नसतो. या साठी लग्नाच्या आधीच दोघांची चाचणी करणे गरजेचे आहे.

थॅलेसीमिया आजारामागील काही तथ्ये -

थॅलेसीमिया या गंभीर आजारात भरपूर रक्त आणि औषधे लागतात. त्यासाठी भरपूर पैसे सुद्धा खर्च होतो. सगळेच या आजारांवर खर्च करू शकतात असे नाही. त्यामुळे पैसे अभावी उपचार मिळत नसल्याने वयोगट 12 ते 15 वर्षाची मुलं मरण पावतात आणि व्यवस्थित औषधोपचार मिळाल्यावर त्यांची जगण्याची प्रमाण जास्त असतात. या आजारामध्ये जसं जसं वय वाढते तसं तसं रक्ताची गरज जास्त भासू लागते. वेळच्या वेळीच योग्य ती काळजी घेऊन आपण या आजाराला ओळखणे कधी ही चांगलेच.

या साठी अस्थी मज्जा प्रत्यरोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन) एक प्रकारची शल्य चिकित्सा असते ते करणे फायदेशीर असतं. पण हे फारच खर्चिक असते. जगभरात थॅलेसीमिया, सिकल सेल, सिकलथेल, हिमोफिलिया, या आजाराचे मुलं पैशाअभावी वयोगट 8 ते 10 वर्षांपेक्षा जास्त जगत नाही.

संदर्भ (इंग्रजी)

संपादन