त्राटिका किंवा ताडका रामायणात उल्लेख असलेली एक राक्षसी होती. विश्वामित्राच्या यज्ञाचा भंग करणाऱ्या राक्षसांपैकी ती एक होती. रामाने स्त्री असूनही विश्वामित्रांच्या सूचनेनुसार तिचा वध केला.

एखाद्या कजाग स्त्रीला त्राटिका म्हणतात.

वा.बा. केळकर यांनी 'संगीत चौदावे रत्न अर्थात त्राटिका' नावाचे नाटक लिहिले आहे. हे नाटक विल्यम शेक्सपियरच्या 'टेमिंग ऑफ द श्ऱ्यू'चे मराठी रूपांतर आहे. त्यात त्राटिकेची स्त्री-भूमिका मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी केली होती.