तोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजुस होतो. गुटखा, सिगरेट वा तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.

जिभेच्या खालील बाजूस झालेला कर्करोग

लक्षणे

संपादन

तोंडाच्या कर्करोगामध्ये पुढील लक्षणांपैकी एक किंवा अधिक लक्षणे दिसून येतात[]

  • तोंडात लाल/पांढरे चट्टे उठणे
  • जबड्याची हालचाल करताना त्रास होणे
  • ओठ बधीर होणे
  • मानेत गाठ होणे
  • दात अचानक सैल होणे
  • तोंडात रक्तस्राव होणे

कारणे

संपादन

तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे.

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "तोंडाचा कर्करोग का होतो? | पुढारी". www.pudhari.news. 2018-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-04-30 रोजी पाहिले.