तैलरंगचित्रण (इंग्लिश: Oil painting, ऑइल पेंटिंग ;) ही तैलरंगांनी चित्रे रंगवण्याची तंत्रपद्धत आहे. या पद्धतीत वाळणाऱ्या तेलाच्या माध्यमात रंग मिसळून चित्रे रंगवतात. तैलरंगासाठी अनेक प्रकारांची तेले, उदा. जवसाचे तेल, अक्रोडाचे तेल, सॅफ्लॉवर तेल, पॉपीबियांचे ते इत्यादी, माध्यम म्हणून वापरली जातात. मध्ययुगीन युरोपात विशेषकरून जवसाचे तेल तैलरंगचित्रणासाठी माध्यम म्हणून लोकप्रिय होते.

लिओनार्दो दा विंची याने तैलरंगात रंगवलेले चित्र "मोनालिसा" (इ.स. १५०३-०६)

तैलरंगाचा सर्वांत पहिला ज्ञात वापर इ.स.च्या पाचव्या ते नवव्या शतकांमध्ये अफगाणिस्तानात भारतीयचिनी चित्रकारांनी रंगवलेल्या बौद्ध चित्रांमध्ये आढळतो. परंतु त्यापुढील काळात इ.स.च्या पंधराव्या शतकाच्या आरंभापर्यंत हे माध्यम काहीसे मागे पडले असावे. इ.स.च्या पंधराव्या शतकाच्या सुमारास या माध्यमाचे फायदे उमजू लागल्यावर युरोपात प्रथम उत्तर युरोपातील फ्लेमिश तैलरंगचित्रणाच्या परंपरेतून व त्यानंतर युरोपीय प्रबोधनकाळातील बहुतांश चित्रकारांच्या प्रतिभेतून तैलरंगचित्रणाची पद्धत लोकप्रिय ठरली.

बाह्य दुवे

संपादन