तैमूरलंग (८ एप्रिल, इ.स. १३३६ - १८ फेब्रुवारी, इ.स. १४०५) हा चौदाव्या शतकातील तुर्क-मंगोल वंशीय योद्धा व कुशल सेनापती होता. याने १3९८ मध्ये दिल्लीवर आक्रमण केले व जबरदस्त शिरकाण केले. तसेच याने युरोपीय देशांमध्येही आक्रमणे करून मोठा प्रदेश जिंकला होता.

Timur reconstruction03.jpg

मुघल साम्राज्याचा स्थापक बाबर हा तैमूरच्या वंशातील होता. तैमूरने धर्माच्या नावाखाली बराच नरसंहार करून तैमुरी साम्राज्याची स्थापना व विस्तार केला.