तुसु उत्सव हा बंगाली पौष महिन्यात येणारा हिवाळी संक्रमण काळातील एक महत्त्वाचा सण आहे.[]याला मकर पर्व असेही म्हणले जाते.स्थानिक पातळीवर सुगीचा आनंद देणारा शेती शी संबंधित उत्सव आहे. बँकुरा,पुरूलिया, बर्धमान आणि हुगळी या जिल्ह्यांमधील गावांमधे हा उत्सव साजरा केला जातो.

झारखंड मधील तुसु उत्सव

व्युत्पत्ती

संपादन

हा शेतीशी संबंधित सण असल्याने त्याचा संबंध भाताच्या(धान्य तांदूळ) तुसाशी जोडला गेलेला आहे.[] बंगाली भाषेत त्याला तुशु म्हणले जाते आणि मराठीत त्याला तूस असे म्हणले जाते.


स्वरूप

संपादन

तुसु ही एक वैश्विक देवता मानली गेली आहे. ही कुमारी माता असून सुगीशी संबंधित स्थानिक माहिलांनी लिहीलेली लोकगीते गाऊन तिचा गौरव केला जातो.[]उत्सवाच्या शेवटच्या दिवशी तुसु देवतेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.यादरम्यान जत्रा आयोजित केली जाते.स्थानिक लोक जत्रेचा आनंद घेतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ Bengal, India Superintendent of Census Operations, West (1965). District Census Handbook, West Bengal: Calcutta. v (इंग्रजी भाषेत). Superintendent, Government Printing.
  2. ^ Schulte-Droesch, Lea (2018-09-10). Making Place through Ritual: Land, Environment and Region among the Santal of Central India (इंग्रजी भाषेत). Walter de Gruyter GmbH & Co KG. ISBN 978-3-11-053985-1.
  3. ^ Claus, Peter; Diamond, Sarah; Mills, Margaret (2020-10-28). South Asian Folklore: An Encyclopedia (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 978-1-000-10122-5.