तुषार कांबळे (२ ऑगस्ट, १९८८:मुंबई, महाराष्ट्र - ) एक भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार आहे.[१] तुषार कांबळे यांना २००९ मध्ये यश चोप्रा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ते मिमी आणि बधाई हो सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत जेथे त्यांना २०२१ मध्ये स्टारडस्ट फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.[२]

मागील जीवन आणि शिक्षण संपादन

त्यांनी मुंबई विद्यापीठातून आयटी डिप्लोमा मध्ये पदवी पूर्ण केली. २०१२ मध्ये त्यांनी फोटो विभागात दैनिक जागरण या वृत्तपत्रासाठी काम करण्यास सुरुवात केली. २०१५ मध्ये त्याने एक छायाचित्रकार म्हणून बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द सुरू केली. २०१६ मध्ये ते बेफिक्री चित्रपटाच्या चित्रीकरण विभागात होते. २०१८-२०२१ या कालावधीत त्याने बधाई हो, बेल बॉटम आणि मिमी सारख्या चित्रपटांसाठी काम केले. मिमी चित्रपटासाठी त्यांना २०२१ मध्ये स्टारडस्ट फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.[३]

पुरस्कार संपादन

यश चोप्रा प्रमाणपत्र (२००९)

स्टारडस्ट फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार (२०२१)

बाह्य दुवे संपादन

तुषार कांबळे आयएमडीबीवर

संदर्भ संपादन

  1. ^ "Here's all about Tushar Yuvraj Kamble - an artist by heart". The Asian Age. 2019-08-18. 2021-09-16 रोजी पाहिले.
  2. ^ "Tushar Kamble is a top IT specialist and Lifestyle Blogger in Dubai". DNA India (इंग्रजी भाषेत). 2021-09-01. 2021-09-16 रोजी पाहिले.
  3. ^ Desk, IBT Entertainment (2019-08-20). "Tushar Yuvraj Kamble A man who is rewarded for his outstanding work by B-town's legend Late Yash Chopra". www.ibtimes.co.in (इंग्रजी भाषेत). 2021-09-16 रोजी पाहिले.