तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय
तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (टी सी कॉलेज) हे पुणे जिल्ह्यामधील बारामती येथील एक जुने महाविद्यालय आहे. महाविद्यालयाची स्थापना १९६२ साली झाली. महाविद्यालयाचा विस्तार ४० एकरांवर आहे. महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. महाविद्यालयात अन्न प्रक्रिया, पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमे या विषयांचे पदवी स्तरावरचे व्यावसायिक अभ्यासक्रम चालतात.[१]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
इतिहास
संपादनमहाविद्यालयाचे उद्घाटन २३ जून १९६२ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे पूर्वीचे नाव 'बारामती कॉलेज' असे होते. सुरुवातीला महाविद्यालयात १२० विद्यार्थी आणि १२ प्राध्यापक होते. २१ जून १९६९ रोजी महाविद्यालयाचे नामांतर 'तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय' असे करण्यात आले. एस. टी. वणकुद्रे महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "http://www.tccollege.org". www.tccollege.org. 2018-03-25 रोजी पाहिले. External link in
|title=
(सहाय्य)