तीस्ता नदी

बांगलादेशातील नदी

तीस्ता (बांग्ला: তিস্তা) ही भारताच्या सिक्कीम राज्यामधील प्रमुख नदी आहे. सिक्कीमच्या उत्तर भागात भारत-चीन देशांच्या सीमेजवळ हिमालय पर्वतामध्ये उगम पावणारी तीस्ता दक्षिण व आग्नेय दिशांना ३०९ किमी वाहत जाऊन बांगलादेशाच्या रंगपूर जिल्ह्यात ब्रह्मपुत्रेला मिळते. सिक्कीम व पश्चिम बंगाल राज्यांची सीमा तीस्तावरून ठरवण्यात आली आहे. जलपाईगुडीकालिंपोंग ही उत्तर बंगालमधील प्रमुख शहरे ह्याच नदीच्या काठावर वसली आहेत.

तीस्ता नदी
তিস্তা
तीस्ताचे सिक्कीममधील पात्र
उगम झेमू ग्लेशियर, हिमालय
मुख ब्रह्मपुत्रा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत ध्वज भारत, बांगलादेश ध्वज बांगलादेश
लांबी ३०९ किमी (१९२ मैल)
उगम स्थान उंची ७,०६८ मी (२३,१८९ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १२,५४०
ह्या नदीस मिळते ब्रह्मपुत्रा नदी

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत