जयवर्मन तिसरा
(तिसरा जयवर्मन या पानावरून पुनर्निर्देशित)
जयवर्मन तिसरा (ख्मेर: ជ័យវរ្ម័នទី៣; ?? - इ.स. ८७७) हा ख्मेर राजवंशाचा दुसरा सम्राट होता. या साम्राज्याच्या स्थापक दुसऱ्या जयवर्मनचा मुलगा असलेल्या या राजबद्दल इतिहासात कमी माहिती आढळते.
प्रासाद शकमधील वर्णनानुसार "एकदा हा हत्तींची शिकार करण्यास गेला असता हत्ती त्याच्या कचाट्यातून निसटला तेव्हा आकाशवाणी झाली की जर त्याने (जयवर्मनाने) अभयारण्ये उभारली तर त्याला तो हत्ती मिळेल."[१]
जयवर्मनने इ.स. ८७५मध्ये इंद्रपूर (आताचे क्वांग नाम) येथे आपली राजधानी उभारली.
जयवर्मन इ.स. ८७७मध्ये मृत्यू पावला. याचा मृत्यू हत्तींचा पाठलाग करीत असताना झाला असावा अशी समजूत आहे.[२]
याच्यानंतर इंद्रवर्मन पहिला ख्मेर सम्राटपदी आला.
संदर्भ आणि नोंदी
संपादनइतर संदर्भ
संपादन- ब्रिग्स, लॉरेन्स पामर. द एन्शियंट ख्मेर एम्पायर. अमेरिकन फिलॉसोफिकल सोसायटीची कागदपत्रे, १९५१.
- हिगहॅम, चार्ल्स. द सिव्हिलायझेशन ऑफ आंगकोर. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया प्रेस, २००१.
मागील दुसरा जयवर्मन |
ख्मेर राजवंश इ.स. ८५०-इ.स. ८७७ |
पुढील पहिला इंद्रवर्मन |