पहिला इंद्रवर्मन
(इंद्रवर्मन पहिला या पानावरून पुनर्निर्देशित)
इंद्रवर्मन पहिला (ख्मेर: ឥន្រ្ទវរ្ម័នទី១) हा ख्मेर राजवंशाचा तिसरा सम्राट होता. इंद्रवर्मन इ.स. ८७७ ते इ.स. ८८९पर्यंत सत्तेवर होता. याची राजधानी हरिहरालय येथे होती. याने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक भव्य देवळे व इतर इमारती बांधल्या. याचबरोबर त्याने कंबोडियामध्ये अनेक सरोवरे व कालवे बांधले. यामुळे तेथे भातशेती करणे सोपे झाले. आपल्या राज्याभिषेकानंतर इंद्रवर्मनाने जाहीर केले की मी पाच दिवसांच्या आत खणणे सुरू करेन.[१] त्याप्रमाणे त्याने इंद्रताटक हे त्यावेळचे सगळ्यात मोठे सरोवर बांधले. ३.८ किमी लांबी व ८०० मीटर रुंदीच्या या सरोवरात ७५ लाख घनमीटर पाणी साठवणे शक्य होते. आता हे सरोवर कोरडे आहे.
इंद्रवर्मन इ.स. ८८९मध्ये मृत्यू पावला. याच्यानंतर यशोवर्मन पहिला ख्मेर सम्राटपदी आला.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Bhattacharya, 2009, p. 31
इतर संदर्भ
संपादन- भट्टाचार्य, कमलेश्वर. अ सिलेक्शन ऑफ संस्कृत इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम कंबोडिया. in collaboration with Karl-Heinz Golzio.
- हिगहॅम, चार्ल्स. द सिव्हिलायझेशन ऑफ आंगकोर (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- सेव्हेरोस, पू. नूव्हेल्स इन्स्क्रिशन्स दु कांबोज (फ्रेंच भाषेत). Tome II et III. पॅरिस.
मागील तिसरा जयवर्मन |
{{{शीर्षक}}} इ.स. ८७७-इ.स. ८८९ |
पुढील पहिला यशोवर्मन |