तियोदोरो ओबियांग एन्गेमा एम्बासोगो

तियोदोरो ओबियांग एन्गेमा एम्बासोगो (स्पॅनिश: Teodoro Obiang Nguema Mbasogo; जन्म: ६ जून १९४२) हा मध्य आफ्रिकेतील इक्वेटोरीयल गिनी देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्षहुकुमशहा आहे. १९७९ साली ओबियांगने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को मासियास एन्गेमा ह्याला एका लष्करी बंडाद्वारे सत्तेवरून हाकलवून लावले. तेव्हापासून ओबियांग इक्वेटोरीयल गिनीच्या राष्ट्रप्रमुखपदावर आहे.

तियोदोरो ओबियांग एन्गेमा एम्बासोगो
तियोदोरो ओबियांग एन्गेमा एम्बासोगो


इक्वेटोरीयल गिनी ध्वज इक्वेटोरीयल गिनीचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
३ ऑगस्ट १९७९
मागील फ्रान्सिस्को मासियास एन्गेमा

जन्म ६ जून, १९४२ (1942-06-06) (वय: ७८)
अकोआकान, स्पॅनिश गिनी (आजचा इक्वेटोरीयल गिनी)
धर्म रोमन कॅथलिक

ओबियांग सत्तेवर आल्यापासून अनेक अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजयी झाला आहे परंतु त्या सर्व निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतांची अफरातफर झाली असा दावा आंतरराष्ट्रीय समुदायाने केला आहे. अनेक अमेरिकन वृत्तपत्रांनी त्याची आफ्रिकेमधील सर्वात वाईट हुकुमशहा अशी निंदा केली आहे. त्याच्यावर भ्रष्टाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन इत्यादी अनेक आरोप केले गेले आहेत.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा