तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
(तांबडी जोगेश्वरी गणपती या पानावरून पुनर्निर्देशित)
तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[१] इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.[२]
इतिहास
संपादन१८८३ साली भाऊ बेंद्रे यांनी या गणेश मंडळाची स्थापना केली. तांबडी जोगेश्वरी ही देवी पुण्याची ग्रामदेवता मानली जाते. तिच्या परिसरातील ही गणेश असल्याने त्याला देवीच्या नावाने ओळखले जाते.[३] शारदीय नवरात्र उत्सवकाळात तांबडी जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला भाविक येतात. ही देवी आणि येथील गणपती ही दोन्ही दैवते भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.[४]
चित्रदालन
संपादन-
श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळ,पुणे
संदर्भ
संपादन- ^ "पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि त्यांचा इतिहास!". लोकमत. 2019-08-28. 2021-09-08 रोजी पाहिले.
- ^ "मानाच्या दुसऱ्या 'तांबडी जोगेश्वरी' गणपतीचे विसर्जन". दैनिक प्रभात. 2021-09-17 रोजी पाहिले.
- ^ "इतिहास पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पां". दैनिक प्रभात. 2022-09-02. 2022-09-03 रोजी पाहिले.
- ^ Gandhile, Dr Ganesh Dattoba (2023-08-01). “A GEOGRAPHICAL STUDY OF PILGRAMAGE TOURISM OF PUNE DISTRICT” (इंग्रजी भाषेत). Laxmi Book Publication. ISBN 978-1-312-34312-2.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपती | |
---|---|
कसबा गणपती • तांबडी जोगेश्वरी गणपती • गुरुजी तालीम गणपती • तुळशीबाग गणपती • केसरीवाडा गणपती • दगडूशेठ हलवाई गणपती |