तळेगाव

स्थान

संपादन

तळेगाव हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या तालुक्यात आहे. हे गाव चाळीसगाव - नांदगाव रस्त्यावर वसलेले आहे. चाळीसगाव येथे रेल्वे स्थानक आहे.

लोकजीवन

संपादन

गावात प्रामुख्याने हिंदू धर्मीय आहेत. गावातील ५० टक्के लोकसंख्या ही मराठा जातीची आहे.

प्रशासन

संपादन

इथला कारभार हा ग्रामपंचायतीमार्फत चालतो. हे गाव चाळीसगाव पोलीस स्टेशनाच्या हद्दीत येते. तलाठी कार्यालय चाळीसगाव येथे आहे.

शिक्षण

संपादन

गावात प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाची व्यवस्था आहे. पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.

आरोग्य

संपादन

गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच खाजगी इस्पितळही आहे.

व्यवसाय

संपादन

येथील जनजीवन हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. काही लोक इतर व्यवसाय करतात. येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक व आय डी बी आय, या बँका आहेत.