कोतवाल म्हणजेच तलाठी सहायक हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली कामे तसेच गौणखनिज देखरेख करतो. कोतवालाची नेमणूक तहसीलदार (मामलेदार) करतो. प्रत्येक साझा साठी एक कोतवाल असतो. कोतवाल म्हणजेच तलाठी सहायक नेमणूक करण्याचे अधिकार तहसिलदारास आहेत. कोतवालाचे मानधन दि.०१ जानेवारी २०१२ पासून दरमहा ₹ ५०१० इतके करण्यात आले आहे. भारतामध्ये कोतवाल हे पद मोगल कालखंडामध्ये गावातील प्रशासन चालविण्यासाठी निर्माण करण्यात आले. कोतवाल हा पूर्णवेळ काम करणारा कनिष्ठ ग्रॅनोकर आहे व त्या संबधीत गावात राहणे बंधनकारक असते. तो गावातील २४ तास शासकीय सेवेस बांधील असतो. सुरुवातीला कोतवाल या पदासाठी वंश परंपरा होती. परंतु १९५९ पासून राज्यातील वंश परंपरागत किंवा वतनी गावकामगारांची नियुक्ती रद्द करण्यात आली. सध्या महाराष्ट्रामध्ये १३, ६३६ पेक्षा अधिक कोतवाल कार्यरत आहे.

  • कोतवाल पदाच्या नावात बदल करून तलाठी सहायक असे नामकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक ०५ नोव्हेंबर २०२२ रोजी घेतला आहे. पण कोतवाल नामविस्तार (अंमलबजावणी प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे)
  • महसूल प्रशासन यंत्रणा
             जिल्हाधिकारी
                |
            उपजिल्हाधिकारी
                |
             तहसीलदार
                |
           नायब तहसीलदार
                |
         महसूल मंडळ अधिकारी
                |
               तलाठी
                |
         तलाठी सहायक कोतवाल.
  • तलाठी सहायक (कोतवालांची) संख्या :

कोतवालांची संख्या गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. गावाची लोकसंख्या कोतवाल १००० पर्यंत १ १००१ ते ३००० पर्यंत २ ३००१ ते पुढे ३

– एखाद्या गावात ३ पेक्षा अधिक तलाठी सहायक म्हणजेच कोतवाल नेमण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यास असतो. परंतु त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते.

  • पात्रता :

१) तो व्यक्त्ती स्थानिक गावाचा रहिवासी असावा. २) वय -१८ ते ४० दरम्यान असावे. ३) शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा. ४) संबंधित उमेदवाराची वर्तवणूक व चरित्र चांगले असावे. ५) उमेदवार किमान ४ थी उत्तीर्ण असावा. ६) कुळकायद्याप्रमाणे नमूद केलेल्या जमिनीपेक्षा जास्त जमीन संबंधित व्यक्तीने धारण नसावी. ७) नियुक्तीच्या वेळी कोतवालास १०० रु. तारण व दोन जमीन द्यावे लागतात. ८) कोतवालाच्या नेमणुकीपूर्वी संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस सब – इन्स्पेक्टरची परवानगी घ्यावी लागते. -कोतवालांची नेमणूक करताना पूर्वीच्या गाव वतनदार कनिष्ठ ग्रॅनोकराना प्राधान्य दिले जाते. नेमणूक कार्यक्षेत्रे तहसीलदार ( पहिली नेमणूक सहा महिन्यासाठी ) वेतन 15000 रु. ( 2023 पासून ) नियंत्रण कोतवालावर तलाठी व पोलीस पाटील रजा किरकोळ रजा तलाठी ( ८-१२ दिवस )अर्जित रजा तहसीलदार ( ३० दिवस )

( रजेच्या काळात शेजारच्या गावातील कोतवाल काम पाहतो ) राजीनामा तहसीलदार बडतर्फी तहसीलदार सेवानिवृत्ती ६० वर्ष )

  • तलाठी सहायक कोतवालांची कामे :

१) गावातील शासकीय दप्तराची ने – आण करणे. २) गावात दवंडी पिटवून सरकारी सूचना देणे. ३) आवश्यक तेव्हा गावकऱ्यांना चावडी व सज्जा येथे बोलावणे. ४) गावातील चावडी व सज्जा कार्यालयाची स्वच्छता ठेवणे. ५) गावातील जन्म, मृत्यू व विवाह यांच्या नोंदीची माहिती ग्रामसेवकाला देणे. ६) पोलीस पाटलाच्या रखवालीत / ताब्यात असलेल्या कैद्यांवर पहारा देणे. ७) गावातील गुन्ह्यासंबंधी पोलीस पाटलास माहिती देणे. ८) तलाठी, पोलीस पाटील व ग्रामसेवक यांच्या कामात मदत करणे. ९) वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपवलेली कामे पार पाडणे. १०) सरकारचे पत्रव्यवहार पोचविणे.