तत्पुरुष समास ही भाषेच्या व्याकरणातील एक संकल्पना आहे.[]

समासामध्ये दोन स्वतंत्र शब्द किंवा त्याहून अधिक शब्द एकत्र जोडले जातात आणि त्यातून एक नवा सामासिक शब्द तयार केला जातो. समासात पूर्वपद आणि उत्तरपद अशी दोन पदे असतात.[]

तत्पुरुष समासाचे वैशिष्ट्य

संपादन

या समासात पूर्वपदापेक्षा उत्तरपद हे प्रधान असते. उत्तरपद विशेष्य तर पूर्वपद विशेषण असते.[]

प्रकार

संपादन

तत्पुरुष समासाचे पुढील प्रकार आहेत-
१. कर्म तत्पुरुष
२. करण तत्पुरुष
३. संप्रदान तत्पुरुष
४. अपादान तत्पुरुष
५. संबंध तत्पुरुष
६. अधिकरण तत्पुरुष
७ नञ तत्पुरुष
८. द्विगु तत्पुरुष []

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d Vishesh Hindi Vyakaran VIII (हिंदी भाषेत). Laxmi Publications. ISBN 9789380644455.