ढोल ताशा पथक
ढोल ताशा पथक हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन मानले जाते. ढोल आणि ताशा ही महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्ये मानली जातात. या वाद्यांना ऐतिहासिक महत्व देखील आहे.
महत्व
संपादनढोल आणि ताशा ही मंगलवाद्ये म्हणून सण उत्सव तसेच विशेष कार्यक्रमात वाजविण्याची पद्धती प्रचलित आहे. गणेशोत्सव प्रसंगी ढोल ताशा वाजविण्याची पद्धती महाराष्ट्रात आणि इतरत्र रुजलेली दिसून येते.[१]
ऐतिहासिक महत्व
संपादनब्रिटिश काळात विशेष प्रसंगी निधत असलेल्या मिरवणुका वाद्यांच्या गजरात निघत असत. त्यासाठी विशेष परवानगी घेतली जात असे. कालांतराने मेळे यामध्ये ध्वज, लेझीम असे खेळ सादर होत असत. काही काळानंतर बंड पडलेली ही प्रथा पुनरुज्जीवित झालेली दिसून येते.[२]
गणेशोत्सवातील इतिहास
संपादन१९६५ सालाच्या आसपास गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये ढोल ताशा लेझीम या सिवजी अनिष्ट प्रथा वाढू लागल्या. मिरवणुकीची शिस्त बिघडली. याच काळात पुणे शहराच्या ग्रामीण भागातील काही कलाकारांनी ढोल ताशा झांज वादनाची प्रथा सुरू ठेवली होती. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी या संस्थेचे संस्थापक कै. विनायक विश्वनाथ उर्फ आप्पा पेंडसे यांनी कोंढणपूर येथील श्री. गुलाबराव कांबळे यांचे ताशावादन ऐकले आणि ते प्रभावित झाले. त्यांनी कांबळे यांना सोबतीला घेऊन शालेय विद्यार्थ्यांचे ढोल ताशा बरची पथक सुरू केले. [३]शहरी भागातील हे पहिले ढोल ताशा पथक आहे. यानंतर पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा यांनी अशी पथके सुरू केली. यात स्व-रूपवर्धिनी, रमणबाग, नूतन मराठी विद्यालय, विमलाबाई गरवारे शाळा यांचा समावेश आहे.[२] यानंतर विविध युवा सदस्यांनी एकत्र येऊन आपापली ढोल ताशा ध्वज पथके सुरू केली.[४]
चित्रदालन
संपादन-
मिरवणुकीतल ढोलवादन
-
महिला ढोलवादक
-
ढोल आणि ताशा वादन पथक
संदर्भ
संपादन- ^ "पुण्यातील पहिले ढोल-ताशा पथक कोणी सुरू केले? प्रसिद्ध ढोल पथके कोणती? जाणून घ्या या अनोख्या परंपरेचा इतिहास..." लोकसत्ता. 2023-09-13. 2023-09-23 रोजी पाहिले.
- ^ a b "ढोल-ताशा वादनाचा अनोखा प्रवास". सकाळ. 2023-09-23 रोजी पाहिले.
- ^ देशपांडे, सुभाष (२०२२). गणेशोत्सव नादसंपन्न करणारी ढोल- ताशा पथके. ग्राहकहित. pp. १५.
- ^ "डंका नाशिक ढोलचा : मराठी संस्कृती जतन करणारे 'शिवसाम्राज्य ढोलपथक'". My Mahanagar. 2023-09-12. 2023-09-23 रोजी पाहिले.